शहादा शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
शहादा
राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत
शहरातील विविध प्रभागांमध्ये सुमारे चार कोटी चाळीस लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
शहादा पालिकेवर गेल्या दोन वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे या कालावधीत शहरातील विकास कामे थांबू नये व नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी राज्य शासनाकडे शहराअंतर्गत विकास कामे करण्यासाठी विशेष निधीची मागणी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीची दखल घेत सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पालिका प्रशासनाने विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता घेतली व आज बुधवारी या कामांचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी प्रमुख अतिथी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा मकरंद पाटील मुख्याधिकारी दिनेश सिनारे किसान सेलचे डॉक्टर किशोर पाटील माजी नगरसेवक के डी पाटील डॉक्टर योगेश चौधरी ज्येष्ठ कार्यकर्ता आनंदा पाटील दिनेश खंडेलवाल महिला आघाडीच्या रोहिणी भावसार युवा मोर्चाचे तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
शहरातील आमदार कार्यालया शेजारील मेमन कॉलनी येथे रस्ता तयार करणे, पियु ट्रस्ट कडे व पियु क्लिनीक कडे जाणार रस्ता तयार करणे, प्रभाग क्र. ०६ मधील बापू शिंपी यांच्या घरापासून ते कुवर मँडम यांच्या घरापर्यंत रस्ता व गटार तयार करणे, अनिल जयस्वाल यांच्या घरापासून ते हर्षदा ब्युटी पार्लर पर्यंत रस्ता तयार करणे
,साई बालरुग्णालय ते खगेंद्र कुंभार यांच्या घराजवळ रस्ता व गटार तयार करणे, जेठेमा नगर येथे खुली जागा विकसीत करणे व अंतर्गत रस्ते तयार करणे ,प्रभाग क्र. ०७ गांधीनगर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर परीसरात रस्ता तयार करणे ,हिंदू व्यायाम शाळा येथे पेवर ब्लॉक बसवणे ,रामेश्वर मंदिर मागे सार्वजनिक शौचालय बांधणे ,प्रभाग क्र. ०१ मधील शांतीलाल नागराळे यांच्या घरापासून ते सतीष नागराळे यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे,सरस्वती कॉलनीतील जगदीश जव्हेरी घराजवळील गटार तयार करणे ,यशोधन कॉलनी अंतर्गत उर्वरित रस्ते तयार करणे ,प्रफुल पाटिल यांच्या घरापासून ते सुनिल पाईप पर्यंत गटार तयार करणे ,शिव शंकर कॉलणी मध्ये सभा मंडप बंधणे ,सुधीर वाणी यांच्या घराजवळील रस्ता व गटार तयार करणे या कामांचे भूमिपूजन आज आमदार राजेश पाडवी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास भाऊ चौधरी ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर,भाजपा तालुका अध्यक्ष बालुभाई पाटील, , बांधकाम अभियंता संदीप सूर्यवंशी, माजी नगरसेवक डॉ योगेश चौधरी,राकेश पाटील युवा मोर्चा शहर अध्यक्ष आप्पु पाटील,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव रमाशंकर माळी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोतीशेठ जैन, मयूर पाटील,युवा मोर्चा तालुका उपअध्यक्ष मुनिश जगदेव,भाजपा जिल्हा चिटणीस कमलेश जांगिड,भाजपा उपाध्यक्ष प्रशांत कदम, रोहिणी भावसार,दिपश्री साठे,प्रशात कुलकर्णी,अरविंद पाटील,गोपाल गागुर्डे,प्रदीप ठाकरे,किरण सोनवणे,आत्माराम पाडवी,कल्पेश पाटील,निलेश मतकर,विशाल मोरे,अदित्य डोडवे,गणेश पाटील,सुनिल चव्हाण,सरपच संजय माळी,सुभाष वाघ,सचिन पावरा,नवनाथ वाघ,बापु सोनार,भरत दादा व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते.
मनोगत -
शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत, जनता चौक ते शिवाजी चौक ,खेतिया रस्त्यावरील शब्बो मंडप ते नागसेन नगर पर्यंत तसेच स्टेट बँक चौक ते मोहिदा चौफुली पर्यंत असे चार रस्ते राजपथ रस्ता योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात येणार असून या रस्त्याच्या निर्मितीसाठी राज्य शासनाकडे सत्तर कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहे येत्या काही दिवसात याला मंजुरी मिळणार असून निधी उपलब्ध होणार आहे शहरातील दळणवळण नियोजनबद्ध व्हावे यासाठी हे चारही रस्ते महत्त्वपूर्ण असल्याने आपण यासाठी पाठपुरावा करीत आहोत.
आमदार राजेश पाडवी शहादा विधानसभा
