महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन धुळे जिल्हा मार्फत शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन.




महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन धुळे जिल्हा मार्फत शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन.     

शिरपूर - दिनांक 25/1/2024 रोजी लाल बावटा शेतमजूर युनियन धुळे जिल्हा मार्फत शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर धरणे आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सो शिरपूर मा. प्रमोद भामरे साहेब यांना देण्यात आले मोर्चातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे....... प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान पाच लाख रुपये करण्यात यावे, वृद्ध विधवा निराधार परितेकता यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळावे, मागील फरक त्वरित मिळावा, रोजगार हमी मजुरांना वर्षातून किमान 200 दिवस काम व सहाशे रुपये किमान रोजंदारी मिळावी,   दहिवदफाटा ते अनेर नदीपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात येऊन मंजूर निधीचे प्रभावी अंमलबजावणी करा, शिरपूर पुरवठा विभागातून नवीन दुय्यम विभक्त रेशन कार्ड त्वरित द्या, गोरगरीब  नागरिकांनासले पिवळे रेशन कार्ड द्या , शिरपूर तालुक्यात नव्याने मंजूर झालेल्या पेसा ग्रामपंचायत तरडी , हिसले वगैरे ग्रामपंचायत ना पेसा निधी त्वरित लागू करा. तरडे येथील शिवबारी पाडा वस्तीत विजेचे    पोलडीपी त्वरित बसवा      कसतअसलेल्या गायरान जमिनी    भूमी हिन शेतमजुरांच्यानावावर करा     शिरपूर तालुक्यातील पानंद रस्ता कामातील गैर व्यवहा रची चौकशी करावगैरे मागण्यांचे निवेदन देण्यात आले धरणे आंदोलनात केंद्र व राज्य सरकारच्या शेतमजूर विरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेण्यात आला यावेळेस धुळे जिल्हा शेतमजुर  युनियनजिल्हाध्यक्ष एडवोकेट कॉम्रेड संतोष पाटील यांनी रंजलेल्या गांजलेल्या शेतमजूर वर्गाचे वाढत्या महागाईने  कंबरडे मोडले असून हातावर पोट असणाऱ्या शेतमजुरांना कुठलीही सामाजिक सुरक्षा नाही शिक्षण आरोग्य निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी शेतमजुरांना जिवापाड मेहनत करावी लागते परंतु केंद्रातील व राज्यातील भांडवलधारजीने सरकार शेत मजुरांच्या धोरणाबाबत उदासीन असल्याचे म्हटले, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष कॉम्रेड एडवोकेट हिरालाल परदेशी यांनी देशात गरीब श्रीमंतीची दरी मोठ्या प्रमाणात वाढत असून मोठ्या संख्येने असलेला शेतमजूर हा उपेक्षित वंचित असल्याने शेतमजुरांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले, यावेळेस शेतमजुर युनियन  धुळे जिल्हा सल्लागार एडवोकेट मदन परदेशी, कॉम्रेड अर्जुन कोडी, सामाजिक कार्यकर्ते ओंकार आबा जाधव शेतमजूर युनियन  उपाध्यक्ष  कॉम्रेड भरत सोनार यांनी मनोगत व्यक्त केले धरणे आंदोलनात भाकपचे  शहर सेक्रेटरी  कॉम्रेड जितेंद्र देवरे, भाकर चे एडवोकेट सचिन थोरात शिवा पावरा कॉम्रेड दगा जाधव अमरसिंग पावरा वगैरे लाल बावटा चे कार्यकर्ते  महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होऊन धरणे आंदोलन यशस्वी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने