*नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लॅकेटचे वाटप करुन अनोख्या पद्द्तीने नववर्षाचे स्वागत...!!*
दिनांक 31/12/2023 रोजी अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देवून नववर्षाचे स्वागत करीत असर्ताना पोट भरण्यासाठी स्थलांतर करुन उघड्यावर आयुष्य जगणाऱ्यांना राहण्यासाठी घर नसल्यामुळे रात्रीच्यावेळी रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा रस्त्याच्या कडेलाच राहावे लागते. रक्त गोठवणाऱ्या थंडीत उघड्यावर झोपलेली कोवळी मुले मात्र पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली असतात. सध्या कडाक्याची थंडी सुरु असून नंदुरबार जिल्ह्याचा पारा देखील खाली घसरला आहे. अशा थंडीत पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने दिनांक 31/12/2023 रोजी मध्यरात्री नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीत कुडकुडत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणा-या निराधारांना ब्लॅकेट व चादरचे वाटप केले.
ज्या नागरिकांना घरे आहेत थंडीत गरम कपडे घेवून स्वतःचे व परिवाराचे संरक्षण करु शकतात इतके आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, मात्र ज्यांच्याकडे घर नाही, अंगावर थंडीचे कपडे नाहीत असे फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणा-या निराधारांचे काय ? याचा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील सहानुभूतीपूर्वक व माणुसकीच्या नात्याने विचार करीत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लॅकेट व चादरचे वाटप करुन जिल्हा पोलीस दलाची मायेची ऊब मिळावी अशी संकल्पना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे समोर मांडली. त्यांच्या या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आप- आपल्या पोलीस ठाणे हद्दीत तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी दिनांक 31/12/2023 रोजी मध्यरात्री नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन, वस स्थानकव इतर ठिकाणी थंडीत कुडकुडत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लॅकेट व चादरचे वाटप केले.
थंडीमुळे बऱ्याच लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजार होण्याची शक्यता जास्त असे अशा वेळी या आजारांपासून रेल्वे स्टेशन, बस स्थानक व इतर ठिकाणी उघड्यावर झोपून आयुष्य जगणाऱ्या निराधार व त्यांची कोवळी मुलांना मायेची ऊब देण्यासाठी हा या संकल्पनेमागील उद्देश होता. मागोल वर्षी देखील
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 31/12/2022 रोजीमध्य रात्रीनववर्षाचे स्वागत होत असतांना थंडीत कुडकुडत फुटपाथवर उघड्यावर राहणाऱ्या सुमारे 1500 निराधारांना ब्लॅकेट व चादर वाटप केले होते.
यावर्षी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नंदुरबार शहर पोलीस ठाणे-90, उपनगर पोलीस ठाणे-85, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-60, नवापूर पोलीस ठाणे-90, विसरवाडी पोलीस ठाणे-70, शहादा पोलीस ठाणे- 90, सारंगखेडा पोलीस ठाणे-60, धडगांव पोलीस ठाणे-80, म्हसावद पोलीस ठाणे-90, अक्कलकुवा पोलीस ठाणे-70, तळोदा पोलीस ठाणे-70, मोलगी पोलीस ठाणे-50 आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून-110 असे एकूण 1015 निराधारांना ब्लॅकेट व चादर वाटप करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवथा राखतांना नेहमीच रस्त्यावर / चौकात उभे राहुन कारवाई किंवा लाठी उगारणा-या पोलीस आपल्यांना पहायला मिळातो, परंतु खाकी वर्दीच्या आड असलेला एक माणुसकीचा चेहरा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवायला मिळालेला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधोक्षक श्री. पी. आर. पाटील यांची समाजाप्रती असलेली तळमळ, समाजिक बांधिलकी त्यांच्या कर्तृत्वाने आज पुन्हा एकदा सर्वानी पाहावयाला मिळाली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर वेळी नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री, किरणकुमार खेडकर यांचेसह नंदुरबार शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
