आपातकालीन वापरासाठी पेट्रोल डिझेलचा साठा राखीव करा - महेश पाटील यांचे निवेदन
नाशिक प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात केंद्र सरकारने बनवलेल्या हिट अँड रन बाबतचा कायदा सर्वच वाहन चालकांना अन्यायकारक वाटत असून देशभरात याबाबत वाहन चालक आंदोलन व निषेध करत आहेत. यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतूक करणाऱ्या चालकांनी देखील संप पुकारल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ट्रक चालकांच्या संप काळात रुग्ण वाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस विभागातील वाहने तसेच इतर महत्वाच्या वाहनांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील पेट्रोल पंपांवर पेट्रोल राखीव ठेवण्याच्या करण्याच्या सूचना देणे देण्यात यावा अशी विनंती करणारे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील प्रशासनास यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात ट्रकचालक यांनी संप पुकारला असल्यामुळे जो पर्यंत या संपावर तोडगा निघत नाही व जो पर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात असलेल्या रुग्णवाहिका,अग्निशमन वाहने, पोलीस वाहने तसेच इतर महत्वाच्या वाहनांसाठी इंधन पुरवठा पेट्रोल पंपांवर राखीव ठेवण्याच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आदेशित करण्यात यावे.
महाराष्ट्रातील रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस वाहने, तसेच तातडीच्या उपाययोजनांसाठी असणाऱ्या वाहनांमध्ये वेळीच इंधनपुरवठा उपलब्ध न झाल्यास खूप मोठा अनर्थ महाराष्ट्रात घडण्याची दाट शक्यता आहे.
रुग्ण वाहिकांना वेळीच पेट्रोल किवा डीझेल उपलब्ध न झाल्यास तातडीच्या रुग्णांना वेळीच हॉस्पिटल पर्यंत पाठवणे कठीण होईल व या मुळे अनेक रुग्णांचे प्राण जाऊ शकतात. तसेच अग्निशमन वाहनांना वेळीच इंधन पुरवठा न झाल्यास जिल्यातील इतर ठिकाणी आग लागल्यास पेट्रोल नसल्यामुळे अग्निशमन वाहने वेळीच उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्या मुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन जाईल व या मुळे अनेक नागरिकांचे प्राण हि जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच पोलीस विभागाच्या वाहनांमध्ये इंधन उपलब्ध न झाल्यास वेळेत पोलीस प्रशासन उपलब्ध न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच इतर तातडीच्या सेवांसाठी राखीव असणार्या वाहनांमध्ये इंधन उपलब्ध न झाल्यास अनेक अति महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते.
तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात यावे व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपांवर अति महत्वाच्या वाहनांसाठी इंधन राखीव ठेवण्याचे आदेश लवकरात लवकर देण्यात यावेत असे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
