शिंदखेडा तालुका विज्ञान प्रदर्शनात कु. पुर्वा चव्हाण तृतीय क्रमांकाने सन्मानित!*




*शिंदखेडा तालुका विज्ञान प्रदर्शनात कु. पुर्वा चव्हाण तृतीय क्रमांकाने सन्मानित!*

*दाेंडाईचा प्रतिनिधी :-  दाेंडाईचा ता. शिंदखेडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता १० वी वर्गातील विद्यार्थिनी कु. पुर्वा रत्नदिप चव्हाण हीने शिंदखेडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आराेग्य विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.* 
     शिक्षण विभाग पंचायत समिती शिंदखेडा, शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ, शिंदखेडा तालुका गाणित व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओ. एम. रूपनर माध्यमिक विद्यालय, बाभळे ता. शिंदखेडा येथे ४४ वे शिंदखेडा तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सन २०२३-२४ समारंभ दि. ३ व ४ जानेवारी २०२४ राेजी पार पडला. या प्रदर्शनात कु. पुर्वा चव्हाण हिने आराेग्य विषयावर उत्कृष्ट सादरीकरण केले. म्हणून तिला मान्यवरांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवुन गाैरविण्यात आले. तर या प्रदर्शनात कु. पुर्वा हीने सादर केलेल्या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. विज्ञान विषय शिक्षक श्री.रियाज काझी, श्री. जितेंद्र निकम सर यांनी तिला मार्गदर्शन केले. तर तिच्या पालकांनी परिश्रम घेतले. कु.पुर्वाच्या  उज्वल यशासाठी  संस्थेचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब रावल, संस्थेचे सचिव शिप्राताई रावल,  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा राजपूत, श्रीमती ज्योत्स्ना मेहता
 तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी तिचे अभिनंदन केले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने