रोटरी स्कूलमध्ये शालांतर्गत विज्ञान व गणित प्रदर्शन
दोडाईचा मुस्तफा शाह
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांत शालेय जीवनापासून गणित व विज्ञानाबाबत गोडी लागून समाजजीवनास उपयुक्त शोध लावता यावेत या उद्देशाने शालेय स्तरावर विज्ञान व गणित प्रदर्शन भरविण्यात आले.या प्रदर्शनाला अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, प्रमुख पाहुणे म्हणून सचालक श्री पी.सी.शिंदे, श्री रमेश पारख, सौ हेतल शाह, उपस्थित होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल, वायू प्रदूषण, ज्वालामुखी, होलोग्राम,पावसाच्या पाण्याची साठवण,औद्योगिक वसाहत, रोबोट, सूर्यग्रहण, सौरमंडल, स्पिन लॉन्चर, अपूर्णांक,बेरीज-वजाबाकी, पायथागोरसचे प्रमेय,दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व अशा विविध विषयावर विज्ञानाचा व गणिताचा सकारात्मक वापर होण्याच्या दृष्टीने आधुनिक पद्धतीने एकूण 150 उपकरणांची आकर्षक मांडणी केली. विद्यार्थ्यांनी उपकरणाची पाहणी करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे, शिक्षक ,विद्यार्थी व पालकांना उपकरणांविषयी समाधानकारक माहिती सांगून त्याचे महत्त्व पटवून दिले. पालकांनी मोठया संख्येने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनी कल्पकतेने तयार केलेल्या उपकरणांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रदर्शनातील इ.1ली व 2 रीच्या गटात पार्थ गिरी प्रथम,मोरवी चौधरी, आर्या भामरे, मनस्वी गायकवाड द्वितीय, हर्षअदित्य सिसोदिया तृतीय.इ.3 व 4 थीच्या गटात राशी पाटील, आदित्यराज देशमुख प्रथम,आराध्या महाजन, कन्वी पवार द्वितीय,लावण्या लोहाना, परिधी रूपंचंदाणी तृतीय. इ. 5 वी व 6 वीच्या गटात स्वराज्ञा लहासे,अक्सा खान प्रथम,सृष्टी पाटील, हंसिका बडगुजर द्वितीय, आराध्या पाटील, समिक्षा चौधरी तृतीय, तर 7 वी ते 9 वीच्या गटात गुंजीत भदाणे,धिरज सोनवणे, नमन बच्छाव प्रथम, ध्रुव महाजन, प्रथमेश सोनजे,जॉन महात्मे द्वितीय,तर वैष्णवी ठाकरे, पूर्वा पटेल व आकांक्षा राजपूत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. गणिती उपकरणात विभा गिरासे प्रथम सिद्धार्थ राजने द्वितीय, लावण्या राजपूत, काव्या चौधरी व दिव्यश्री लहामगे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. परीक्षक म्हणून आर.डी.एम.पी. ज्युनि. कॉलेजचे प्रा. डी.डी. गिरासे, गर्ल्स हायस्कूलचे विज्ञानशिक्षक श्री एन.के.मालपूरकर, प्रशांत परदेशी,किर्ती शाह यांनी काम पाहिले
प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी आपल्या भाषणातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा विविध अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास होत असून त्यांच्यांत विज्ञानप्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन संशोधनवृत्ती जोपासली जाते. शालेय व्यवस्थापन मंडळाने शाळेत उपलब्ध करून दिलेली अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेची सुविधा व शिक्षकांचे प्रोत्साहन मिळत असल्याने रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला आसल्याचे सांगितले.
प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी प्रशांत जाधव, विज्ञान विभाग प्रमुख प्रशांत परदेशी, गोपाल ढोले, मोनी शर्मा,अमृता गिरासे, ज्योत्स्ना गिरासे, निशा पाटील, सुलभा राजपूत, जाफर मिर्झा, धनंजय शिंदे, विक्की बाटुंगे यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले,तर आभार सुवर्णा महाजन यांनी मानले.
