नायलॉन मांजा व नायलॉन मांजा तयार करण्यासाठी बनविलेली बनावटी मशीन जप्त
शिरपुर शहर पो.स्टे. चे डी.वी. पथकाची कारवाई
शिरपूर - शिरपुर शहर पो.स्टे. चे डी.वी. पथकाची कारवाई (पतंग उडविण्यासाठी शासनाने प्रतिबंधीत केलेला ३०,१८०/- रूपये किंमतीचा नायलॉन मांजा व नायलॉन मांजा तयार करण्यासाठी बनविलेली बनावटी मशीन जप्त करून कारवाई केली आहे.
दि.१४/०१/२०२४ रोजी १८.०० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री.ए.एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर जि. धुळे येथे वडगल्लीतील महावीर प्रोव्हिजन दुकानात इसम नामे- हरीश हंसराज जैन स.स्थ गल्ली, चरचे गाव शिरपुर जि.धुळे हा त्याचे दुकानात सक्रांत सणाचे दिवसात पतंग उडविण्यासाठी शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजाची चोरटी विक्री करीत आहे.
त्यावरुन शिरपुर शहर पो.स्टे.चे पोनि ए.एस. आगरकर, पोउनि/संदिप मुरकूटे व संदिप दरवडे तसेच शोध पथकाचे अंमलदार व दोन पंच अशांनी शिरपुर जि.धुळे शहरातील वड गल्लीतील महावीर प्रोव्हिजन दुकान येथे जावुन इसम नामे हरीश हंसराज जैन वय ५२ व्यवसाय व्यापार रा. रथ गल्ली, वरचे गाव शिरपुर जि.धुळे हा शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास चंदी घातलेली असतांना सुध्दा तो स्वतःचे आर्थिक फायदयासाठी शासनाने जारी केलेल्या मनाई आदेशाचे करुन एकुण ३०.१८०/-रुपये किंमतीचा मांजा मालाचो चोरटी विक्री करण्यासाठी कब्जात वाळगतांना मिळुन आल्याने त्याचंवर छापा टाकुन त्यास मालासह ताव्यात घेवुन त्याचेविरुध्द शोध पथकाचे पोकों/मनोज महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५,१५ सह भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, श्री. सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर, पोउनि संदिप मुरकूटे, संदिप दरबडे व शोध पथकाचे पोहंकों/ललित पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकॉ योगेश दाभाडे, प्रशांत पवार, आरीफ तडवी, भटु साळुंके, विनोद अखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, मनोज दाभाडे, गोविंद कोळी व चापोकों/ विजय पाटील अशांनी मिळून केली आहे.
शासनाने सक्रांत सणाचे कालावधीत पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातली असुन कोणीही पतंग उडविण्यासाठी मांजा मालाचा गैरकायदेशीर वापर करु नये. जर कोणी पतंग उडविण्यासाठी मांजा मालाची चोरटी विक्री करीत असल्याचे अगर त्याचा गर कायदेशीररित्या वापर करीत असल्याचे माहित झाल्यास त्याचेवर पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५.१५ सह भावि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शिरपुर मधील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे.