अथक प्रयत्नांनी 900 ग्रॅम चे बाळ सुखरूप डॉक्टर विशाल पाटील, शहादा ( सुमित गिरासे )शहादा




अथक प्रयत्नांनी 900 ग्रॅम चे बाळ सुखरूप  डॉक्टर विशाल पाटील, शहादा 

( सुमित गिरासे )शहादा

 तालुक्यातील मानमोड्या येथील रायसीबाई पावरा यांनी नुसतेच एका सात महिन्याच्या बाळाला जन्म दिला मात्र बाळाचे वजन 900 ग्रॅम असल्याने डॉक्टर टीम साठी मोठे आवाहन होते, मात्र आज बाळ सुखरूप असल्याचे  डॉक्टरांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, याबाबत अधिक माहिती अशी की शहादा शहरापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावरील मानमोडे हे 100% आदिवासी लोकवस्तीने वसलेले गाव असून या गावातील रायसी बाई पंडित पावरा व त्यांचे पती मध्य प्रदेशातील जाल्यापाणी  या गावी विवाह सोहळा कार्यक्रमाला गेले असता या गरोदर महिलेला तीव्र वेदना सुरू झाल्याने या महिलेने चक्क रस्त्यातच या सात महिन्याच्या बाळाला जन्म दिला, मोठ्या परिश्रमाने नातेवाईक या बाळाला व बाळाच्या आईला घेऊन पानसेमल येथील शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचले, आईची प्रकृती खराब असल्याने त्या बाळाच्या आईला तेथेच उपचारासाठी एडमिट करण्यात आले, मात्र या जन्माला आलेल्या बाळाचे वजन केवळ 900 ग्रॅम असल्याकारणाने पुढील उपचारासाठी एम्बोलस द्वारे शहादा येथील चैतन्य हॉस्पिटल ला ऍडमिट करण्यात आले, सात महिन्याच्या बाळ तेही 900 ग्रॅम वजन असलेला डॉक्टर व त्यांच्या टीम साठी मोठे आवाहनच होते अशा परिस्थितीत अथक प्रयत्नांनी आज बाळाला नववा दिवस असून बाळ आज दर दोन-तीन तासांनी पाच दहा एम, एल, आईचे दूध घेत आहे,  हे बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे,



प्रतिक्रिया ➖
 संबंधित बाळ हे सात महिन्याचे असून या बाळाचे वजन 900 ग्रॅम पर्यंत आहे, बाळाला योग्य वेळेस उपचार मिळाल्यामुळे या बाळाची प्रकृती मध्ये  चांगल्या प्रकारे  सध्या सुधारणा आहे, रस्त्यात जन्मलेले बाळ आणि सुमारे 40 45 किलोमीटरचा अंतर गाठात हे बाळ शहादा पर्यंत पोचले हीच एक चांगली गोष्ट आहे, बाळाला तात्काळ अति दक्षता विभागामध्ये म्हणजेच NICU मध्ये तात्काळ घेतल्यामुळे बाळाला ऑक्सीजन व योग्य उपचार मिळाल्यामुळे आज बाळ सुखरूप आहे,

➖ डॉक्टर विशाल पाटील, बालरोग तज्ञ, चैतन्य हॉस्पिटल शहादा,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने