धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ व शिरपूर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
डॉक्टर हाऊस येथे पत्रकार संघातर्फे भव्य हृदयरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबीर संपन्न
शिरपूर - धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व पत्रकार मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची शिरपूर तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी सकाळी 10 ते 3 वाजेच्या दरम्यान शहरातील बस स्टँङजवळ वरवाङे रस्त्यावरील ङाँक्टर हाऊस येथे पत्रकार,पोलीस, नगरपालिका कर्मचारी,जेष्ठ नागरिक,माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत हृदयरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
प्रभूराम प्राणप्रतिष्ठा व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिरपुर पत्रकार संघ व ललित स्वीट अँड गणेश ट्रेडिंग यांच्या वतीने धुळे येथील विनिंग हार्ट केअर सेंटरचे डॉ.हर्षद सुराणा याच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ प्रसन्न कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर,डॉ.अमित गुजराथी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत धन्वंतरी व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.शिबिरात 65 पेक्षा जास्त संख्येने रुग्णाची तपासणी करण्यात आली याप्रसंगी शिरपूर शहर व तालुक्यातील पत्रकार,पोलिस कर्मचारी,माजी सैनिक,जेष्ठ नागरिक व नगर परिषद कर्मचारी या सर्वांच्या कुटूंबातील 65 पेक्षा जास्त सदस्यांची तपासणी करीत डॉ हर्षद सुराणा यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिरपुर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर संघाचे सचिव लक्ष्मण बडगुजर यांनी केले. आभार प्रदर्शन अविनाश पाटील यांनी केले.
