म्हसावद पोलिसांनी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या स्पिरिट ची वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी कारवाई 70 हजाराचे अवैध स्पिरिट जप्त
नंदुरबार - शहादा तालुक्यातील म्हसावद येथे बनावट दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या स्पिरिट घेऊन जाणाऱ्या धडगाव रस्त्यावर पोलीस प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करत 70 हजाराच्या दारू बनवण्यासाठी लागणारे स्पिरिट जप्त करण्यात आला. शिवाय वाहतूक करणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
धडगाव रस्त्यावर वीरपुर ते दरा फाटा गावाकडे जाणाऱ्या रोड वर कार क्रमांक एमएच ०१ बीए ८९७५ वाहनामध्ये स्पिरिट घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेच्या पथकाने सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान दरा फाटा जवळ रस्त्यावर सापडा रचून धडगाव कडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत स्पिरिट वाहतूक करणाऱ्या आरोपी अनिल नर्सिंग वसावे रा. डोमखेळी ता. धडगाव, आणि मुकेश आजमा वसावे रा। जलावना ता. धडगाव यांना ताब्यात घेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांची अधिक चौकशी करण्यात आली त्यात अडीच लाख रुपये किमती ची सेंट्रो कार सह 70 हजाराच्या स्पिरिट असा एकूण तीन लाख वीस हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर , यांच्या मार्गदर्शनाने पोलीस नाईक मोहन जमणारे अविनाश चव्हाण पुरुषोत्तम सोनार विकास कापुरे अभिमन्यू गावित दीपक नावी आणि सोयब शेख तसेच म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे व कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास म्हसावद पोलीस स्टेशनचे सह.पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील हे करत आहे.
