चोरीचे गुन्ह्यातील तसेच ३ वर्षापासुन फरार असलेले २ आरोपीतांना शिरपूर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद




चोरीचे गुन्ह्यातील तसेच ३ वर्षापासुन  फरार असलेले २ आरोपीतांना शिरपूर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद 



शिरपूर - शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर यांना गुग्न बातमीदारा मार्फत वालमी मिळालो को. शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ७९/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणं चारीच गुन्ह्यानांल सुमारे ५ वर्षापासुन फरार असलेला आरोपो नामे आनंदसिंग ऊर्फ पिंटु प्रताप ठाकरे (भिल, वय ३५ रा. खामखेडा ता. शिरपूर जि. धुळे हा खामखेडा गावात आलेला असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरून शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी दि. २२/१२/२०२३ रोजी खामखेडा गावात जावून सदर आरोपोताचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केली.

तसेच आज दि. २३/१२/२०२३ रोजी शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. २३४/२०२० भावि कलम ४८९ (अ). ४८९ (क). ४८९ प्रमाणे बनावट चलनी नोटाचे गुन्ह्यातील सुमारे ३ वर्षापासुन फरार असलेला आरोपां नामं मंगल पंजाब बेलदार वय २७ रा. कळमसरे ता. शिरपूर जि. धुळे हा कळमसरे गावात आलेला असल्यायावत मिळालेल्या बातमीवरून शिरपूर शहर पो.स्टे. चे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी दि.२३/१२/२०२३ रोजी कळमसरे गावात जावुन सदर आरोपीताचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यान अटक केली

वरील प्रमाणे ५ वर्षापासुन चोरीचे गुन्ह्यातील तसेच ३ वर्षांपासुन बनावट चलनी नोटांचे गुन्ह्यातील फरार असलेले २ आरोपीतांना शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदार यांनी शिताफीने ताब्यात घेवुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे,  अपर पोलीस अधिक्षक  किशोर काळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार, गणेश कुटे. संदिप मुरकुटे, संदिप दरवडे व सुरेश सोनवणे तसेच डी.वी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, कैलास वाघ पोना/ रविंद्र आखडमल, पोकों/योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटु साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, प्रशांत पवार, आरीफ तडवी तसेच चापोकों/विजय पाटील व होमगार्ड मिथुन पवार अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने