इंदापूरच्या आश्रमशाळा पदाधिकाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे. पण धान्य मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन राहणार सुरु प्रतिनिधी दत्ता पारेकर




इंदापूरच्या आश्रमशाळा पदाधिकाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे.

पण धान्य मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन राहणार सुरु

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृहात एकूण ३६८ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. परंतु शासनाच्या नारी निकेतन योजनेतून वेळोवेळी निवेदने देऊन व आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरेंनी उपोषण केल्यावर आश्वासन देऊन देखील माहे-ऑक्टोबर २०२३ पासून अद्याप निवासी विद्यार्थ्यांना देय असणारे धान्य मिळाले नसल्याने  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह  दि.१४/१२/२०२३ पासून बेमुदत  उपोषण सुरू केले होते, परंतु  मा. तहसीलदार, इंदापूर यांचे विनंती वरून त्याच दिवशी म्हणजेच दि.१४/१२/२३ रोजी सायं. ठीक ७.४५ वा. नायब तहसीलदार मयूर बनसोडे यांनी उपोषणकर्त्यांना विनंती करत तुमच्या आश्रमशाळेला व वसतिगृहांना ८ दिवसाचे आत धान्य वितरित करतो असे आश्वासन देऊन उपोषण सोडवले.
यावेळी उपोषण कर्त्यांच्या वतीने ॲड. समीर मखरे म्हणाले की, आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडत आहोत परंतु दि.१५/१२/२३ पासून धान्य मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन आम्ही  सुरू ठेवणार आहोत.
ॲड.मखरे पुढे म्हणाले की,जर तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आत धान्य न दिल्यास दि.२६/१२/२०२३ पासून आम्ही आमच्या आश्रमशाळेचे विद्यार्थी कचेरीत आणून दररोज शाळा तहसील कचेरीतच भरवू असे यावेळी नमूद केले.
यावेळी संस्थेचे संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने