शिरपुर तालुक्यातील 1026 या खताचा तुटवडा विक्रेत्यांच्या साठा तपासून कारवाईची मागणी




शिरपुर तालुक्यातील 1026 या खताचा तुटवडा 
विक्रेत्यांच्या साठा तपासून कारवाईची मागणी


शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात 10 26 च्या खतांच्या तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून शेतकऱ्यांना 10 26 चे मागणी केल्यानंतर विक्रेत्यांकडून पुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या समोरील अनेक अडचणी वाढले आहेत. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील विक्रेत्यांच्या खतांच्या साठा तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व  सविस्तर साठा मुबलक प्रमाणात तालुक्यात उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी कृषी विकास अधिकारी यांना  जिल्हा परिषद सदस्य सौ अभिलाषा भरत पाटील, वनावल गट व पंचायत समिती सदस्य भरत भिलाजी पाटील आणि देविदास पंडित पाटील उपसरपंच खर्दे यांनी निवेदन सादर केले आहे.


या निवेदनात नमूद केले आहे की सद्यस्थितीत रब्बी हंगामाचा कालावधी असून शेतक- यांनी शेतात रब्धीचे पिके लावली आहेत. हया हगामात शेतक-यांना फार मोठया प्रमाणात विविध खतांची आवश्यकता भासत असते.

परंतु शिरपुर तालुक्यात गद्‌द्या 1026 व विविध खतापा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. शेतकरी विविध दुकांनामध्ये व विक्रेत्यांकडे 1026 खतांची मागणी करत असतात परतु विक्रेते है 1026 छात शिल्लक नसल्याचे उत्तर देवून पुरवठा करीत नसल्यामुळे शेतक-यांना मोठया प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध न झाल्यासह हातात येणा-या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे आधीच शेतकरी विविध नैसर्गिक संकटामुळे, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतक-यांना खतांचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतक-यांवर गंभीर संकट निर्माण होणार आहे.

या सर्व बाबींचा गांर्भीयपुर्वक विचार करुन गिरपुर तालुक्यात शेतक-यांना पुरेसे खत उपलब्ध होणेसाठी शिरपुर तालुक्यातील सर्व विक्रेते यांच्या कडील खतांचा साठा तपासण्यात यावा व शेतक-याना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होतील याचे कृपया नियोजन करावे व कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने