विचखेडे जवळ कंटेनर पिकपच्या अपघात ; ३ ठार,८ गंभीर
पारोळा - येथील नॅशनल हायवे क्रमांक सहावर विचखेडा गावाजवळ कंटेनर व पिकप यात जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच तर एकाचा उपचारार्थ जाताना वाटेतच मृत्यू होऊन आठ जण गंभीर झाल्याची घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली.सदर मृत व जखमी हे तालुक्यातील बोळे येथील असुन या घटनेने बोळे गावावर शोककळा पसरली आहे.
पारोळा तालुक्यातील बोळे येथील २१ जण हे चिलाने ता शिंदखेडा येथे अंत्यविधीसाठी महिंद्रा पिकअप एम एच १८ एम ५५५४ ने जात असताना कंटेनर जी जे १२ बी डबल्यू ७२५४ या वरील चालकाच्या ताबा सुटल्याने जोरदार धडक झाली.यात रेखाबाई गणेश कोळी (५५) योगिता रवींद्र पाटील (४०), चंदनबाई नाना गिरासे (५०) हे ठार झाले तर रजनी सुरेशसिंग गिरासे (६०),भरत रामभाऊ गिरासे (६५),राजेश साखरा कोळी (४५),भीमकोट सत्तारसिंग गिरासे (५०),भुराबाई मोरसिंग गिरासे (५०) भुराबाई तात्या गिरासे (६०)रेखाबाई अधिकार गिरासे (६०),नानाभाऊ गुलाब गिरासे (५५),बुराबाई साहेबराव गिरासे (४५),सुनीता नारायण गिरासे (४४),बुराबाई भीमसिंह गिरासे,(५०),सय्यद लिंगायत मालेगाव (२९),हिराबाई विजयसिंह गिरासे, भिमकुर जंमत गिरासे,भगवान नवलसिंग गिरासे,राजनसिंग भरतसिंग गिरासे,रुपसिंग नवलसिंग गिरासे,दयाबाई रूपसिंग गिरासे,राजेबाई साहेबराव कोळी असे जखमी झालेत.अपघात एवढा भीषण होता की कंटेनर व पिकप च्या पुढचा भाग संपूर्ण चक्काचुर झाला होता,जखमींना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करून वैद्यकिय अधिकारी डॉ राजेश वाल्हडे,डॉ अमोल भोसले, डॉ सुनील पारोचे,डॉ प्रवीण ठाकरे,परीचारिका प्रतिभा गुरव, पंकज पाटील,विशाल गोयल,प्रेम वानखेडे,राजू वानखेडे,दीपक सोनार,भुषण पाटील यांनी उपचार केला.तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात तसेच धुळे, जळगाव येथे हलविण्यात आले. दरम्यान, रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर,आशुतोष शेलार, ऋषिकेश सूर्यवंशी,रोशन पाटील, यश ठाकुर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ मदत कार्य केले.यावेळी घटनास्थळी व पारोळा कुटीर रुग्णालयात पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, अमर वसावे आदींनी भेट दिली. अपघाताचे वृत्त समजतात पारोळा शहरासह बोळे व इतर परिसरातील नागरिकांनी पारोळा कुटीर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
अपघाताची माहिती माजी पालकमंत्री डॉ.सतीश भास्करराव पाटील यांना मिळताच त्यांनी कुटीर रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली व त्यांना योग्य उपचार,सेवा देण्यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्णांना व नातेवाईकांना धीर दिला.यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुधाकर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन,शहराध्यक्ष जितेंद्र पाटील,भैय्यासाहेब माने,योगेश रोकडे,माजी नगरसेवक राजेंद्र कासार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
