मालपुर येथील साईभक्त साई दर्शनासाठी शिर्डी येथे पदयात्रा मार्गस्थ.



मालपुर येथील साईभक्त साई दर्शनासाठी शिर्डी येथे पदयात्रा मार्गस्थ.
 
 शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथील संतोषीमाता नगरातील साईभक्त तरुण सर्व सहभागी शिर्डी येथे  साई चा गजर करत, आज सकाळी दहा वाजता मार्गस्थ होत आहेत,
 दर सालाबादप्रमाणे भक्तीमय वातावरणात साईचा गजर करीत संस्कार व संस्कृतीचा संदेश देत शिर्डीला पायी चालत जाऊ लागले आहेत त्यांचे हे आठवे वर्ष आहे. 
 फटाक्यांची आतिषबाजी करून तोफेची सलामी दिली.
 त्याप्रसंगी धवल दूध उत्पादन संस्थेचे संस्थापक श्री हेमराज नाना पाटील., वीरेंद्र गोसावी, लालू रावल पत्रकार प्रभाकर आडगाळे, व सर्व साईभक्त उपस्थित होते.

 हेमराज पाटील यांनी पालखीची आरती केली तर लालू रावल यांनी साईबाबाच्या  मूर्तीची आरती केली. प्रसाद वाटत कार्यक्रमाचे सांगता केली गावात मिरवणूक करून साई भक्त मार्गस्थ झाले. ओम साई ग्रुपच्या अध्यक्षांनी आमच्या प्रतिनिधींना दिलेली माहिती. ते म्हणतात की आम्ही मालपुर गावाहून आज मार्गस्थ होत आहोत 31 तारखेला पोहोचणार आहोत व पहाटेची आरती करून मालपुर येथेएक तारखेला घरी माघारी परतणार. जय श्री साईनाथ. इरादे लाख बनते है, बनके तुट जाते है, जिने साईबाबा बुलाते है वही पैदल, जाते है.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने