मराठी चित्रपट क्लब 52 मध्ये अभिनेत्री यशश्री व्यकटेशने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे मन जिकंले प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी




मराठी चित्रपट क्लब 52 मध्ये अभिनेत्री यशश्री व्यकटेशने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे मन जिकंले 

प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी 

नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटा बद्धल प्रेक्षकांना काय वाटते हे जाणून घ्यायचे असेल चित्रपट गृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे राहिले कि प्रक्षकांची कुजबुज ऐकायला मिळते कि, यात जेव्हा चित्रपटातील जोडी उत्तम वाटली अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. 



त्यावेळी कलाकार खऱ्या अर्थाने कलाकार आनंदी होतो. नुकताच 'क्लब 52' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेत्री यशश्री  व्यंकटेश आणि  अभिनेता हार्दिक जोशी यांनी मुख्य व्यक्तीरेखा साकार केली आहे. या दोघांनी ही वेगवेगळ्या माध्यमातून काम केले असल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढणे साहजिकचं आहे. त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले. पण त्या दोघांची जोडीही छान आहे अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.या चित्रपटात यशश्रीवरती चित्रित करण्यात आलेली लावली. साताऱ्याला गेली मी, सांगलीला गेली मी... मला पाहू नका वरखाली, मी आहे तमाशेवाली... ही लावली प्रसिद्ध गायिका रेश्मा सोनवणे यांनी गायली असून करण आणि दर्शन, गीतकार - सुजाता पवार हे आहेत. सद्या ही लावणी ट्रेडिंगमध्ये आहे. बाकीचे मंत्रमुग्ध करणारी गीते आदर्श शिंदे, मधुर शिंदे, यशश्री व्यंकटेश चंद्रकला दासरी यांनी गायली आहेत. तर गीतकार बजरंग बादशहा, अजय वाघमारे सुजाता पवार यांनी ही गीते लिहली आहेत. या चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, राधा सागर, भरत  ठाकूर आणि टीना सोनी हे आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने