डॉ. जितेंद्र ठाकूर यांचे शिरपूरचे स्वीय सहाय्यक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन




डॉ. जितेंद्र ठाकूर यांचे शिरपूरचे स्वीय सहाय्यक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिरपूर तालुक्यात आज अत्यंत वाईट आणि दुर्दैवी अशी घटना घडली असून डॉ जितेंद्र ठाकूर यांचे स्विय्य साहाय्यक दिनेश अशोक पाटील (श्याम पाटील ) वय ३५, राहणार अर्थे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांचे आज दि 16 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे.

अत्यंत मनमिळाऊ ,प्रामाणिक, व सर्वांशी स्नेहभाव ठेवून वागणूक करणारे व निष्ठेने आपले काम करणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.

 आज सायंकाळच्या सुमारास ते आपल्या शिरपूर येथील घरी असताना त्यांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला. तातडीने त्यांना शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले मात्र तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली होती.

तालुक्यातील अनेक नागरिकांना आरोग्याच्या विषयी मदत करताना त्यांनी भरीव  काम केले होते .मात्र दुर्दैव असे की स्वतःच्या जीवावर बेतले तेव्हा हॉस्पिटल पर्यंत पोहोचणे देखील शक्य झाले नाही.


 त्यांना मृत अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळावर मित्र
मंडळीं, नातेवाईक ,आप्तेष्ट, सामाजिक राजकीय पदाधिकारी गर्दी केली. या घटनेने परिवारावर फार मोठे संकट ओढवले आहे. 

उद्या दि 17 रोजी सकाळी 10 वाजता अर्थे  येथे राहत्या घरापासून शाम पाटील यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. शाम पाटील यांच्या पश्चात चार वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, दोन भाऊ असा परिवार  आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने