विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरुपी बस थांबा देण्याची विनंती, शिरपूर आगार प्रमुखांचे दुर्लक्ष
शिरपूर प्रतिनिधी -
शिरपूर शहरात बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत बस सेवेचा लाभ घेता यावा यासाठी बस थांबा देण्याची मागणी वनावल येथील सागर धनगर यांनी निवेदन देऊन शिरपूर बस स्टॅन्ड चे आगार प्रमुख यांना दिले आहे. यापूर्वी देखील या आशयाचे निवेदन दिनांक 8/ 9/ 2023 रोजी देण्यात आले होते. मात्र अद्याप या निवेदनावर कोणताही विचार न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले आहे.
शिरपुर ते रुदावली बस व शिरपूर ते बाळदे किवा उपरपिड बस कन्या शाळेवरुन येत असते. परंतु बस आर.सी. पटेल इंग्लिमेडीम शाळा क्रांतीनगर गेट समोर बाबत नाही. (रुदावली ते शिरपुर जाते वेळी व रुदावली ते शिरपुर येते वेळी आणी उपरपिड ते शिरपुर व शिरपुर ते उपरपिंड जाते वेळी) विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बस थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी बस थांबत नसल्याने तेथील विद्याथ्यांना बऱ्याच अडचणी येत असता व ते विद्याथ्यर्थी ग्रामीण भागीतील असतांना दररोज ते घरी उशोरा बेत असतात.
तरी या स्मरणपत्राचे तात्काळ विचार करुन निर्णय घ्यावा अन्यथा आम्हा वरील अधिका-यांकडे या अर्जाची दाद मागावी लागेल अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.
