शिरपूर कॉटेज रुग्णालयात रुग्णांना पुरेपूर व दर्जेदार सेवा द्या
शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी ,आंदोलनाचा इशारा
शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमोल जैन यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब व गरजू रुग्णांना परिपूर्ण दर्जेदार सेवा देण्याची मागणी केली यावेळेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा बाबत माहिती घेण्यात आली रुग्णालयात शंभर बेडउपलब्ध असून सध्या तीनच डॉक्टर कार्यरत आहेत दवाखान्यासाठी तेरा डॉक्टरांची आवश्यकता असून पुरेशा कर्मचाऱ्यांना अभावी रुग्णांना सेवा देण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे डॉक्टर अमोल जैन यांनी सांगितले रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असून मशीन ऑपरेटर नसल्यामुळे मशीन बंद अवस्थेत आहे तसेच पॅथॉलॉजी ला देखील टेक्निशियन अभावी बंद आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या अभावीमुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात शासनाचे मोफत आरोग्य योजना ही कागदावरच असून प्रत्यक्षात शिरपूर तालुक्यात त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही परिणामी मोठ्या संख्येने असलेले आदिवासीबहुल शिरपूर तालुक्यात गोरगरी रुग्णांचे हाल होत आहेत त्यातील रुग्ण कल्याण समिती देखील गोरगरिबांना पुरेपूर दर्जेदार सेवा मिळावी यासाठी गंभीर दिसत नाही. रुग्णालयात पुरेसा औषध साठा वैद्यकीय सुविधा अभावी अनेक रुग्णांना जीव गमावा लागलेला आहे. तरी तालुक्यातील गोरगरिबांना परिपूर्ण दर्जेदार सुविधा मिळण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष बी आर एस व धुळे जिल्हा जागृती मंच च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे यावेळेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी. सदस्य एडवोकेट हिरालाल परदेशी, तालुका भारती कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील, जितेंद्र देवरे, कॉम्रेड अर्जुन कोडी, कॉम्रेड भरत सोनार, बापू खैरनार, एडवोकेट सचिन थोरात, भारतीय सेवा संघाचे ओंकार आबा जाधव, धुळे जिल्हा जागृत मंचाच्या, डॉक्टर सरोज पाटील यांच्यातर्फे निवेदन देण्यात येऊन पंधरा दिवसात मागण्याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या इशारा या वेळेस देण्यात आला.
