आता सरकारला सुट्टी नाही सुट्टी नाही: मनोज जरांगे पाटील
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात नवीन तहसील इमारत शेजारील ग्राउंड वरती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली . यासभेत हजारोंच्या संख्येने तरुण, महिला , अबालवृद्ध उपस्थित होते. इंदापूर शहरात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले .
मनोज जरांगे पाटील सभास्थळी पोचल्यानंतर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रवीण पवार यांनी प्रास्ताविक केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी सरकार वरती व काही मराठा नेत्यांवर गंभीर आरोप केले. सरकार मराठा आरक्षणासाठी वेळ काढू पणा करत आहे. परंतु मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी या सभेतून दिला.
आरक्षण किती गरजेचा आहे, शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांची आजची अवस्था काय आहे, तसेच आरक्षण आपलं कसे कोणत्या मार्गाने मिळेल हे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी मराठा बांधवांना आव्हान केले की आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांना व सर्व समाज घटकांना सोबत घ्या . आपल्या सर्कल प्रमाणे सर्व समाज बांधव त्या बैठका घ्या. अनुचित प्रकार करू नका असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले . सभा स्थळी 'जय शिवाजी जय भवानी', 'एक मराठा लाख मराठा', "मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है " अशा प्रकारच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अतिशय सुंदर नियोजन केले होते व ही सभा अतिशय शिस्तबद्धपणे पार पडली. या सभचे सूत्रसंचालन संतोष नरूटे यांनी केले.
