धनगर समाजाने पुणे- सोलापूर हायवे रोखला प्रतिनिधी दत्ता पारेकर



धनगर समाजाने पुणे- सोलापूर हायवे रोखला

 प्रतिनिधी  दत्ता पारेकर 

पुणे : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील पुणे- सोलापूर हायवे रोड   पाटस टोलनाक्यावर  सकल धनगर समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रस्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची अमंलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी हे धनगर समाज बांधव  आपल्या शेळ्या मेंढ्यासह ,  पुणे- सोलापूर हायवे तब्बल एक तास रोखून धरला होता‌. दौंड तालुक्याच्या तहसीलदारांनी मध्यस्थी केल्यानंतर, त्यांना  निवेदन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आले.

  या आंदोलनाच्या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना देवकाते, धनगर समाजाचे युवा नेते घनश्याम हाके, पाटस गावचे माजी सरपंच संभाजी खडके, संतोष बिचुकले व इतर समाज बांधव उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने