धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनी सविंधान सभेचे १० खंड मराठी भाषेचे मुक्तीभुमीस अर्पण करणार संपादक प्रा देवीदास घोडेस्वार , नाशिक शांताराम दुनबळे




धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनी सविंधान  सभेचे   १० खंड  मराठी भाषेचे   मुक्तीभुमीस अर्पण करणार   संपादक  प्रा    देवीदास घोडेस्वार ,                                                 नाशिक शांताराम दुनबळे    

                               नाशिक-:येवला येथील मुक्तीभुमी वर                          धर्मांतर  घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय संविधान सभेचे दोन वर्षे अकरा महिने व सतरा दिवस चाललेले ऐतिहासिक कामकाजाचे एकूण १० खंडात मराठी भाषेत संकलन तथा संपादन करणारे प्रा. देविदास घोडेस्वार हे तिसरे पुष्प दीक्षाभूमी हुन उपस्थित होऊन मुक्तीभूमीस अर्पण करत आहे.
  भारतीय संविधान सभेतील कामकाज मराठी भाषेत अनन्या सोबतच धम्म घोष पत्रिकेचा माध्यमातून त्यांनी पालिभाषा ही मराठी भाषेत लोकांना समजावी म्हणून मोठे काम गेली चाळीस वर्षाहून अधिक काळापासून करत आहे.असे प्रा.घोडेस्वार यांचे जाहीर व्याख्यान मुक्ती महोत्सवात होणार असून संविधान सभेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आपले संविधान ह्या विषयावर ते बोलणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून एस.टी.चौहान,माया चौहान,श्रीराम बनसोड,संध्या बनसोड (सर्व मान्यवर दीक्षाभूमी नागपूर),सुरेश खळे,सुरेश सोनवणे,विकास वाहुळ, प्रा.महेंद्र गायकवाड (संयोजक संविधान साक्षरता-संवर्धन अभियान) हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी मुलांचे वसतिगृह,बाभूळगाव-येवला येथील गृहपाल विक्रांत कुकडे हे असतील सायंकाळी ६:३० वा.
आदिवासी मुलांचे वसतिगृह, बाभूळगाव-येवला येथे व्याख्यान होईल.अशी माहिती मुक्ती मोत्सवाचे मुख्य प्रवर्तक निमंत्रक एस.डी.शेजवळ यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय लोककवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका,येवला
हिरामण मेश्राम,शैलेंद्र वाघसर,मिलिंद गुंजाळ सर,राजरत्न वाहुळ,सुनील वाघ,मयूर सोनवणे,विश्वास जाधव,बाबासाहेब गोविंद,विकास वाहूळ,अझर शाह,सिद्धार्थ ९गुंजाळ,संकेत गुंजाळ,साबूर मोमीन,गौरव साबळे,जयश्री ८सदाफळ,मनोज गुंजाळ,ललित भांबेरे,अक्षय गरुड,हर्षल घोडेराव,सुमित गरुड,समाधान निकाळे,राजू गरुड,पवन दळे,प्रदीप पगारे,गिरीश पाटील,रोहित गायकवाड हे प्रयत्नशील आहेत.

सोबत व्याख्याते प्रा.देविदास घोडेस्वार यांचा फोटो पाठवत आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने