अन्यथा इंदापूरतालुक्यातील अकरा गावातील ग्रामस्थ करणार रस्ता रोको प्रतिनिधी दत्ता पारेकर




अन्यथा  इंदापूरतालुक्यातील अकरा गावातील ग्रामस्थ करणार रस्ता रोको

प्रतिनिधी दत्ता पारेकर 


पुणे: इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक पाटी येथे पुणे -सोलापूर हायवे वरील  चालू असलेल्या रोडच्या कामात इस्टिमेट मध्ये समाविष्ट असणाऱ्या नियोजित ठिकाणीच उड्डाणपूल व्हावा व मागील काही दिवसापासून हे बंद असणारे काम लवकर चालू व्हावे अन्यथा येत्या १२ ऑक्टोबर रोजी त्याच ठिकाणी अकरा गावातील ग्रामस्थासह रास्ता रोको करण्यात येईल अशी मागणी निवेदनाद्वारे (मंगळवार दि.३) रोजी तहसीलदार यांच्याकडे केली.

या रोडवर रेंगाळलेल्या कामामुळे शाळकरी मुले, आबालवृद्ध, शेतकरी, शेतमजूर, लोणी देवकर एमआयडीसी मध्ये कामावर जाणारे मजूर व इतर काम करणारे मजूर यांची नेहमी ये जा असते. रस्त्याचे काम अचानक थांबविल्यामुळे त्यांना येण्या जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.परिणामी त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. 

थोड्याच दिवसात साखर कारखाने चालू होणार आहेत त्यामुळे या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात ऊस वाहतूक होत असते , त्याचबरोबर या ठिकाणावरून अवजड वाहनांची देखील वाहतूक होत असते या सर्व बाबी लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने ताबडतोब काम चालू करून उड्डाणपूल पूर्ण करण्यात यावा अन्यथा १२ ऑक्टोबर रोजी त्याच ठिकाणी वरकुटे बुद्रुक, काळाशी, गंगावळण ,अगोती नं.१, अगोती नं.२, करेवाडी, भावडी ,चांडगाव, बळपुडी, कौठळी, कालठण नं. १ इत्यादी गावातील ग्रामस्थ रस्ता रोको करतील अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

निवेदनातील काही प्रमुख मागण्या अशा आहेत सदर पुलाचे काम तातडीने चालू करावे, सर्विस रोड चे काम तातडीने पूर्ण करावे , सर्व ठिकाणी सूचनाफलक लावावे,इस्टिमेट प्रमाणे ठरलेल्या जागीच चॅनेज नं. १२६/७५० पूल या ठिकाणीच करण्यात यावा, ग्रामस्थांना इस्टिमेटची प्रत मिळावी, मुदतीत काम पूर्ण करावे इत्यादी प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार इंदापूर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी बारामती, पोलीस निरीक्षक इंदापूर, मॅनेजर एन पी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड इत्यादींना देण्यात आले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदेश  देवकर, सचिन करे, उपसरपंच अशोक शिंदे उपस्थित होते.

मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी स्वीकारले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने