शिरपूर येथे स्टेअर्स फाऊंडेशन तर्फे जिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा संपन्न
शिरपूर : भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाची मान्यता प्राप्त स्टेअर्स फाऊंडेशनतर्फे धुळे जिल्हास्तरीय मुलामुलींचे फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेला शिरपूर येथील क्रीडा संकुलात प्रारंभ झाला.
शिरपूर डी.वाय.एस.पी. सचिन हिरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष गो.पि. लांडगे, तालीम संघाचे उपाध्यक्ष दिलीप लोहार, मांडळचे माजी सरपंच भटू माळी, शिरपूर कुस्तीगिर परिषदेचे सचिव सुभाष निकुंभे, तालुका सचिव रावसाहेब चव्हाण, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, रविंद्र माळी, लाला चौधरी पहेलवान, पंच शाम कानडे पहेलवान, पंच गणेश फुलपगारे पहेलवान आदी मान्यवर उपस्थित होते.
सुभाष नगर, जुने धुळे येथील रामदास व्यायाम शाळेचा मल्ल यश दिपक सांगळे याने कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 41 किलो वजन गटात विजयी होत गदा प्राप्त केल्याबद्दल त्याचा ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे व मल्ल चंद्रकांत नाना सैंदाणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिरपूर येथील या स्पर्धेत जिल्ह्यातील १५० खेळाडूंनी सहभाग घेतला. विजयी खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे स्टेअर्स फाऊंडेशनचे जिल्हा निरीक्षक वैभव भामरे यांनी नमूद केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष ईश्वर भदाणे, पहेलवान पप्पू माळी, युवराज माळी व त्यांचे सहकारी यांनी प्रयत्न केले.
