*शिंदखेडा तालुकास्तरीय कला शिक्षकांची सहविचार सभा**
दोंडाईचा(अख्तर शाह)
शिंदखेडा तालुक्यातील सर्व कलाशिक्षकांची तालुकास्तरीय सहविचार सभा गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा येथे दि.१७/१०/२०२३, वार मंगळवार रोजी दुपारी-२ वाजता आयोजित करण्यात आली असून तालुक्यातील सर्व कला शिक्षकांनी या सहविचार सभेस उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदर सहविचार सभा शिंदखेडा गट शिक्षनाधिकरी डॉ सी के पाटील यांचे अध्यक्षतेखाली व शिंदखेडा केंद्र प्रमुख सी जी बोरसे व गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापक जे पी निकम यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणारआहे. ह्यात विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्या संदर्भात व कलाशिक्षकांच्या अडचणी संदर्भात व विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण गुणवत्ता विकासाच्या उपक्रमाच्या आयोजन बाबत चर्चा केली जाणार आहे. सदर सहविचार सभेस तालुक्यातील सर्व कलाशिक्षकांनी गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा येथे दि.१७/१०/२०२३, वार मंगळवार रोजी दुपारी-२ वाजता उपस्थित राहण्यासाठी शिंदखेडा तालुका कलाशिक्षक मंडळ तर्फे असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
news
