ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिरपूर शहरात खालचे गाव व वरचे गाव बालाजी संस्थान मार्फत वहन व रथोत्सव महोत्सवाला सुरुवात




ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिरपूर शहरात खालचे गाव व वरचे गाव बालाजी संस्थान मार्फत वहन व रथोत्सव महोत्सवाला सुरुवात


शिरपूर - ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिरपूर शहरात खालचे गाव व वरचे गाव बालाजी संस्थान मार्फत वहन व रथोत्सव महोत्सवाला सुरुवात झाले आहे. वरचे गाव बालाजी संस्थानला148 वर्षांपूर्वीची परंपरा  आणि खालचे गाव बालाजी संस्थान 153 वर्षांची परंपरा जपत 23 वा वर्धापन दिवस साजरा करत श्री वेंकटेश बालाजी संस्थान यावर्षी देखील मोठ्या दिमाखात व उत्साहात धार्मिक वातावरणात वहन व रथोत्सव महोत्सव साजरा करत आहे. 


शिरपूर शहरातील वरचे गाव येथील श्री  व्यंकटेश बालाजी संस्थानच्या नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

दि. १५ ते दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत दररोज हत्ती, चंद्र, सूर्य, मोर, नाग, गरुड, मारुती, वाघ, सिंह, घोडा असे वाहन काढण्यात येणार आहे. सोबतच वहनोत्सव साजरा होईल. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त १८ रोजी विश्वशेयन पूजा, संकल्प पूजा, आदी कार्यक्रम, १९ रोजी विश्वशेयन पूजा, पुण्यह वाचन, महाप्रसाद आदी कार्यक्रम, वाटप कार्यक्रम, तसेच अवतारोत्सव दिनाचे वस्त्र व अलंकार, होम हवन, पूर्णावती महाप्रसादाचे वाटप होईल. २६ रोजी भोग व प्रसाद, २६ ला श्री बालाजी महाराजांची पालखी निघेल. २६ ला मेघश्याम महाराज बुवा (मठाधिपती, श्रीराम बालाजी संस्थान, शिंदखेडा ) यांच्याहस्ते रथाची पूजा सकाळी होईल. माजीमंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आ. काशिराम पावरा, शिरपूर दिवाणी न्यायाधिश आर. आर. भद्रे, प्रथम सह दिवाणी न्यायाधिश पंकज जोशी, द्वितीय सहदिवाणी न्यायाधीश मयूर राणे, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, तहसिलदार महेंद्र माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी इतसचिन हिरे, माजी नगराध्यक्ष तथा खालचे गाव श्री बालाजी संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, किसान विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, पोलीस निरीक्षक अनसाराम आगरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष झेंडुसिंग पाटील, उपाध्यक्ष दिलीप लोहार, उपाध्यक्ष उत्तमराव माळी, कोषाध्यक्ष भुपेश अग्रवाल, सहकोषाध्यक्ष किरण दलाल, चिटणीस श्यामकांत ईशी, प्रमुख सल्लागार डिगंबर माळी, विजयसिंग गिरासे, राजेंद्र अग्रवाल, विश्वस्त महेंद्रलाल अग्रवाल, जतिन शहा, सुधीरलाल गुजराथी, जितेंद्र पोतदार, आनंदा लोहार, महादू पाटील, स्विकृत सदस्य प्रसन्न जैन, राजेंद्र गिरासे, नितीन गिरासे, रजेसिंग राजपूत, शशिकांत अग्रवाल, भालचंद्र वाघ, राजेंद्र राजपूत, किरण दलाल, नरेंद्र पाटील, संजय चौधरी, पदमाकर शिरसाठ, उमेश शहा, आशिष पाटील मनोज धनगर, विनायक फुलारी, राजेंद्र चौधरी, कैलास धाकड, धीरज राजपूत, सुनिल अग्रवाल, हरिष जैन, लक्ष्मीकांत मोरे, प्रवीण राजपूत, सुरेश चौधरी, मनीष गुजराथी प्रयास माहेश्वरी, विशाल लये गांव माहेश्वरी, नामदेव वाघ, भूषण माळी, अतुल माळी, नरेश चौधरी, कौस्तुभ शुक्ल, समस्त बालाजी भक्त यांनी केले आहे.

खालचे गाव संस्थान

शिरपूर शहरातील खालचे गाव येथील प्रति तिरुपती श्री बालाजी संस्थानतर्फे नवरात्रोत्सव निमित्त आजपासून वहनोत्सव, सप्तावरण पूजा, ब्रह्मोत्सव पूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात दि. १५ ते दि. २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रीत दररोज अनुक्रमे वाहन हत्ती, चंद्र, सूर्य, मोर, नाग, गरुड, मारुती, वाघ, सिंह, तद् याप्रमाणे दररोज वहनोत्सव सुरु होत आहे. दररोज सुप्रभातम कार्यक्रम तसेच सप्तावरण पुजा आदी कार्यक्रम होतील. ब्रह्मोत्सव पूजा मुख्य आचार्य डॉ. पाराशरम भावनारायणा चार्यालूस्वामी (मुख्य सल्लागार, श्री तिरूमला तिरुपती देवस्थानम, तिरुपती आंध्र प्रदेश) यांच्या अधिपत्याखाली अभिषेक व दहवन कार्यक्रम होईल. २५ रोजी रथोत्सव कार्यक्रम होईल. रथपुजा शिरपूर दिवाणी न्यायाधीश रमेश रावजी भद्रे व तहसिलदार महेंद्र माळी यांच्याहस्ते करण्यात येईल. माजीमंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सह दिवाणी न्यायाधीश पंकज प्रभाकरराव जोशी, आ. काशिराम पावरा, सहदिवाणी न्यायाधीश मयूर यशवंत राणे, उपविभागीय अधिकारी प्रमोद बाळासाहेब भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिरपूर पोलीस निरीक्षक अन्साराम एस. आगरकर, पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होईल. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल, उपाध्यक्ष गोपाल भंडारी, कार्याध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, कोषाध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल, चिटणीस प्रभाकर कुळकर्णी, सहचिटणीस हिरालाल बारी, विश्वस्त चितनभाई अमरिशभाई पटेल, अभिमन भोई, मुरलीधर स्वर्गे, गजानन कलाल, डॉ. सुभाष भंडारी, डॉ. नितिन वैद्य, विजय अग्रवाल, चंद्रकांत भावसार, विजय धाकड, दिपक बारी, सुरेश गुजराथी, नितीन शिपी, सुभाष भोई, स्विकृत सदस्य जितेंद्र जोशी, विलास देशपांडे, प्रदिप गुजराथी, भरत गुजराथी, गोपाल अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, प्रशांत शर्मा, राजेश भंडारी, राजेश बारी, हिरालाल माळी, महेश कोळी आदींनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने