*श्री एस. ए. साकी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार*
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्री.एस.ए.साकी यांना १ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धुळे येथील अजय लॉन्स नगाव बारी येथे राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण भारत सरकार व नॅचरल ह्यूमन राइट कौन्सिल फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सेनेचे कर्नल ब्रिगेडियर गणपती श्रीनिवासन, आ.कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे शिवाजी अकलादे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळेस प्रमोद पाटील, ह्यूमन राईट फोरमचे अध्यक्ष गोरख देवरे उपस्थित होते.
श्री साकी सुलतानअली अख्तरहुसेन हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे रोजगार विमुख शिक्षणात प्रवेश करून देणे इत्यादी कामे केल्यामुळे भारत सरकार व नैसर्गिक मानव अधिकार फॉर्मने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
श्री.एस.ए.साकी हे अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत आहे. दोंडाईचा शहराचे नगरसेवक, व्यापारी, उद्योजक असे सगळ्यांनीच त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
