वाघाडी जवळ गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशरवर शहर पोलिसांची कारवाई,12 जनावरांची केली सुटका आयशरसह 9 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त




वाघाडी जवळ गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशरवर शहर पोलिसांची कारवाई,12 जनावरांची केली सुटका


आयशरसह 9 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त



अक्कलकुवा येथून जळगाव येथे  कत्तलीच्या उद्देशाने शहादा शिरपूर रस्त्यावरून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर रविवारी सकाळी शिरपूर तालुक्यातील वाघाडी जवळ शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करीत 12 गुरांसह  9 लाख 34 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत संशयीत वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.अक्कलकुवा येथून जळगाव येथे शहादा रस्त्यावरून गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना रविवारी सकाळी मिळाली.मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहर पोलिसांच्या पथकाने शहादा शिरपूर रस्त्यावर वाघाडी जवळ हॉटेल संध्या गार्डन समोर सापळा रचला.दरम्यान 10 वाजेच्या सुमारास संशयीत एम एच 18 बीजी 9779 क्रमांकाची आयशर आढळून आली पथकाने सदर आयशर थांबवून चौकशी केली असता वाहनात पुरेशी जागा नसताना अत्यंत डाटावाटीने आखूड दोराने बांधून कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक करतांना 12 जनावरे आढळून आले.पथकाने सदर साडे 8 लाख रुपये किमतीच्या आयशरसह 84 हजाराची 12 जनावरे ताब्यात घेतली.सदर जनावरांची सुटका करून देखभालीसाठी खर्दे येथील गोकुळधाम गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. याप्रकरणी पोना चंदन सोनार यांनी शह पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने संशयीत चालक समाधान एकनाथ पाटील  वय 23 रा.बांभोरी ता.धरणगाव जी जळगाव याच्याविरिद्ध प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने