चोरीच्या बैलजोडीच्या काही तासात शोध, बैल जोडी सह ४ आरोपी जेरबंद

चोरीच्या बैलजोडीच्या काही तासात शोध, बैल जोडी सह ४ आरोपी जेरबंद








शिरपूर प्रतिनिधी - शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण अत्यंत महत्त्वाच्या मानला जातो आणि या सणातील शेतकऱ्यांचे प्रमुख दैवत बैल जोडी असते मात्र पोळा हा सण आगमनाच्या प्रतीक्षेत असताना शेतकऱ्याची बैलजोडी चोरी झाल्याने त्याची चिंता वाढली होती मात्र शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने अवघ्या काही तासात बैलजोडी चोरीचा छडा लावून बैल जोडी हस्तगत करत चार आरोपींवर गुन्हा दाखल करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबाबत पीडित शेतकऱ्याने समाधान व्यक्त करून पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.



याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर शहर पो.स्टे. गु.र.नं. ४३३/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी मुनीराम खुमसिंग पावरा वय ४६ व्यवसाय बैल खरेदी विक्री व्यवसाय रा. धावापाडा ता. शिरपूर जि. धुळे यांनी फिर्याद दिली की, दि.०९/०९/२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता ते दि.१०/०९/२०२३ रोजीचे सकाळी ७.०० वाजेचे सुमारास त्यांच्या मालकीची ६०,०००/- रूपये किमतीची पांढन्या रंगाची बैल जोडी शिरपूर जि.धुळे येथील गुरांचे मार्केटमध्ये बांधलेली असतांना ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने  चोरून नेले बाबत दिलेल्या फिर्यादवरून गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर, शिरपूर शहर पो.स्टे. यांनी डी. बी. पथकाचे पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने तपासचक्रे फिरवून गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढुन संशयीत इसमाचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपूर जि. धुळे येथील गुरांचे मार्केट मधुन पांढऱ्या रंगाची बैल जोडी इसम नामे आरीफ मजीद तेली व त्याचा साथीदार रितीक रतन शिरसाठ दोन्ही रा. शिरपूर जि. धुळे यांनी चोरून नेले बायत बातमी मिळाल्याने सदर इसमांचा शोध घेत असतांना इसम नामे आरीफ मजीद तेली हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार रितीक रतन शिरसाठ तसेच सनी धुडकु सोनवणे व किरण गोपाल सोनवणे (शिंपी) रा. शिरपूर जि. धुळे यांचे मदतीने गुरांचे मार्केट मधील पांढऱ्या रंगाची बैलजोडी चोरून नेल्याचे कबुल करून सदरची बैल जोडी रामसिंग नगर जवळील बर्फ कारखान्या जवळ मोकळया जागेत झाडांजवळ बांधलेली असल्याचे सांगुन वेल जोडी दाखविल्याने जप्त केली. त्यावरून सदर गुन्ह्यात आरोपी नामे १) आरीफ मजीद तेली वय २९ रा. आदर्श नगर, शिरपूर जि. धुळे. २) सनी धडकु सोनवणे वय २६ व ३) किरण गोपाल सोनवणे (शिपी) वय २८ दोन्ही रा. क्रांती नगर, शिरपूर जि. धुळे व ४) रितीक रतन शिरसाट वय १९ रा.पंड्या मांगवाडा, शिरपूर जि. धुळे असे गुन्ह्यात निष्पन्न झाले असुन त्यांनी सदरचा गुन्हा संगणमताने केलेला आहे..

वरनमुद आरोपीतांकडुन गुन्ह्यातील चोरीस गेला माल ६०,०००/- रूपये किंमतीची पांढ-या रंगाची बैल जोडी हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्यात वरील आरोपीतांना दि. ११/०९/२०२३ रोजी अटक केली असुन त्यांची १ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/ललीत पाटील करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय वारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे, श्री.ए.एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉ/ललीत पाटील, पोना/ रविंद्र आखडमल, पोका/विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके, सचिन वाघ, आरीफ तडवी, मनोज महाजन अशांनी मिळून केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने