*दोडाईचा रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा* दोडाईचा (अख्तर शाह)

*दोडाईचा रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा*   
दोडाईचा (अख्तर शाह)   



दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी सरस्वतीमाता व स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
   याप्रसंगी शिक्षकांना शाळेच्या वतीने प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांच्या हस्ते भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. तसेच इ.10 वीच्या विदयार्थ्यांनीही शाळेच्या सर्व विदयार्थ्यांच्या वतीने आपल्या गुरुजनांना गुलाबपुष्प देवून सत्कार केला.
   विद्यार्थ्यांनी  नाटकाच्या माध्यमातून शिक्षकाचे महत्त्व पटवून दिले. संस्कृती ठाकूर,गार्गी सोनार, क्रिशिका गिरासे,आदित्य इंदाणी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षक व शिक्षणाबद्दल  अतिशय जिव्हाळा होता. त्यांच्यामते शिक्षकांचा सन्मान संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे.म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांची  विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आईवडिलांप्रमाणे महत्त्वाची भूमिका असून समाजविकास व देशविकासासाठी  सुशिक्षित  व सुसंस्कृत पिढी घडवण्याचे कार्य शिक्षक करत असतात. अशा शब्दांत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर सुवर्णा महाजन यांनी शिक्षक विद्यार्थ्यांत सुजाण नागरिकत्वाचे गुण रुजविण्याचे कार्य करीत असल्याचे मत मांडले.
       प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक  अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शिक्षक ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. प्रत्येकाने शिक्षकांच्या आदर्शांचे अनुकरण करून उत्तरोत्तर प्रगती करावी.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा पाटील,धारा जैन यांनी केले. तर आभार भूमिका सोनवणे हिने मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने