महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित / विद्युत क्षेत्र कामगार युनियन वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय तांत्रिक कामगार मेळावा व रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित / विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) च्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय तांत्रिक कामगार मेळावा व रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर..



शिरपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित / विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ( १०२९ ) च्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे-नंदुरबार प्रविभागातील सर्व विज कर्मचारी/अधिकारी, सभासद व मित्रपरिवार यांनी दिनांक १०/०९/२०२३ वार. रविवार रोजी श्री नरेंद्र सुरेशसिंग गिरासे व श्री महेश काशिनाथ सोनार यांच्या आयोजित जिल्हास्तरीय तांत्रिक कामगार मेळावा शिरपूर येथे कार्यक्रम करण्यात आला होता त्यानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम आयोजित केले होते.त्याप्रसंगी रक्तदान शिबिराचे व आरोग्य तपासणी शिबिर चे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना युनियन कडून आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच.तसेच ७५ च्या पुढे आरोग्य तपासणी करण्यात आले सदर दिवशी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद तांत्रिक सभासद पदाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आला.


तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे नरेश पाटील यांच्या मार्गदर्शने कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण तर्फे देण्यात आलेले योजनांबाबत संपूर्णपणे माहिती देत मार्गदर्शन केले.


 रक्ताची भासत असलेली निकड पाहता विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत सामाजिक जाणिवेतून घेतलेले रक्तदान शिबिर हे नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. ऊर्जा विभागाचे सर्व कर्मचारी २४ तास जनतेच्या सेवेत अविरतपणे हजर असतात. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदानासारख्या महान कार्यात सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. व युनियनने शिबिरातून संकलन केलेलं रक्त अनेक गरजूंना उपयुक्त ठरणार असून यातून नवीन संजीवनी मिळेल .


 तसेच सामाजिक बांधिलकी जपत युनियनच्या पदाधिकारी व सभासद वर्ग यांनी युनियन मार्फत नेहमी सामाजिक करत असतात. मागील वर्षीही रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.भविष्याती वेळोवेळी अशीच समाज कार्य करून समाजाप्रती दायित्वाची भूमिका बजावत राहतील.


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी, महेश सोनार, नरेंद्र सुरेशसिंग गिरासे, निलेश माळी, ज्ञानेश्वर गिरासे, मिलिंद कढरे, मधुकर बडगुजर, दिलिप बिरारी यांचे विशेष योगदान लाभले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने