लुपिन फांउडेशन संस्थे मार्फत राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन......

लुपिन फांउडेशन संस्थे मार्फत राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन......



 लुपिन हयुमन वेल्फेअर अॅण्ड रिसर्च फांउडेशन धुळे, संस्थेमार्फत कनगाई या गावात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकस आहार व पोषण आहार रोजच्या सकस आहाराचे अन्य साधारण महत्व कुपोषणाचे वाढते प्रमाण, रोजच्या आहारात लहान बालके स्तनदा माता यांच्या रोजच्या आहारातील भाजीपाला, फळे, मांसाहार, कडधान्य याचे आहार - तील महत्त्व सकस आहार या विषयी अंगणवाड परीवेशका. एम. एम. नागपुते मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सी. एच. ओ. विशाल गागरे. सर यांनी मार्गदर्शन केले आजच्या कार्यक्रम प्रसंगी बिरसा मुंडा यांच्या. प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आले व त्यानंतर 0 से 3 व 3 से 6 वयोगटातील 6 बालकांना योग्य निकषानुसार 6 योग्य संगोपीत बालकाची निवड करून त्यांना खेळ साहित्य वितरण केले व त्या कार्यक्रमात फळे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, यांचा आकीवित स्टॉल लावण्यात आला होता

      या कार्यक्रमात गावाचे सरपंच रवींद्र काशिराम पावरा, उप सरपंच, राकेश बापु नाईक ग्राम पंचायत सदस्य, गावातील आशाताई अंगणवाडी सेविका व गावातील ग्रामस्थ व माता बगिनी. तसेच कार्यक्रम यशस्वी रित्या होण्यासाठी लुपिन फांउडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. सुनील सैदाणे सर प्रकल्प समन्वयक श्री चंदन टोकशा सर प्रशिक्षण, समन्वय श्री कुशावर्त पाटिल सर आणि सुळे पी यु चे व्यवस्थापक श्री. सुर्यकांत तावडे सर यांच्या मारदर्शना खाली कार्यक्रम घेण्यात आले . उपस्थितीत कृषीमित्र आणि ग्रामस्थ

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने