धुळे ग्रा. भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी अरुण धोबी
शिरपूर : भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामिण जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. त्यात पुन्हा जिल्हा सरचिटणीसपदी अरुण सुकलाल धोबी यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. गिरीष महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, जिल्हा प्रभारी श्रीमती स्मिताताई वाघ यांचा मान्यतेने धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी जिल्हा कार्यकारणी जाहिर केली असुन त्यात पुन्हा जिल्हा सरचिटणीसपदी अरुण धोबी यांना संधी देण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील भाजपाचे जुने जाणते, निष्ठावंत तथा जेष्ठ पदाधिकारी अरुण धोबी यांची पुन्हा धुळे ग्रा. भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. अरुण धोबी हे गेल्या ३० वर्षापासुन भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असुन त्यांनी आतापर्यंत नगर पालिका, शिरपूर मर्चंट बॅन्क सह विविध स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अनेक निवडणुका लढविल्या आहेत. त्यांनी पक्षात विविध जबाबदार्या यशस्वरित्या पार पाडल्या आहेत. ते सध्या परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष असुन धुळे मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य आदी अनेक सामाजिक संस्थावर कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल दखल घेत त्यांचावर भाजपा श्रेष्ठींनी पुन्हा जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपवली आहे. नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत, माजीमंत्री आ. जयकुमार रावळ, माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, केंद्रीय माजीमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, धुळे ग्रा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, खा. डाॅ. हिना गावीत, आ. काशिराम पावरा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे जिप अध्यक्षा सौ. अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, धुळे मनपा महापौर सौ. प्रतिभा चौधरी, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.
