आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाची बैठक संपन्न
धुळे - मा. जिल्हाधिकारी, धुळे यांचे कार्यालयात नियोजन भवन येथे दि. ०८/०९/२०२३ रोजी सायं. ०६/४५ वाजता श्री. अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे व संजय बारकुंड, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. आयुक्त अमिता दगडे पाटील, मा. श्री नितीन गांवडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ईद ए मिलाद मिरवणुकच्या अनुषंगाने धुळे शहरातील व जिल्हातील तालुका स्तरावरील मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, सिरत कमिटीचे सदस्य, मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक यांची बैठक आयोजीत करण्यात आली.
सदर बैठकीस उपस्थितांनी गणेश विर्सजन व ईद ए मिलाद दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने इंद ए मिलाद मिरवणुक ही एक किंवा दोन दिवसांनी काढण्यात यावी या बाबत बैठकीस हजर मुस्लीम बांधवानी प्रशासनाशी चर्चा करुन आपले मत व्यक्त करुन सर्वाशी चर्चेअंती धुळे शहरातील ईद ए मिलादची मिरवणुक दि. ३०/०९/२०२३ रोजी काढण्यात येईल व त्या व्यतिरीक्त इतर ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका या दि. २९/०९/२०२३ रोजी काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
तसेच सदर मिरवणुकां मध्ये मोठ्या काठयांचे झेंडे फिरविले जाणार नाही, काही अक्षेपार्ह घोषणाबाजी अगर हावभाव, आरडाओरडा करण्यात येणार नाही, असे अक्षेपार्ह आढळुन आल्यास त्या बाबत संबधीता विरुध्द गुन्हे नोंद करण्यात येतील बाबत मा. पोलीस अधिक्षक यांनी सांगीतले.
सदर बैठकीस श्री. अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे व संजय बारकुंड, पोलीस अधिक्षक, धुळे, श्री नितीन गांवडे, निवासी उपजिल्हाधिकारी, श्री किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, धुळे व शिरपुर, सार्वजनीक बांधकाम विभाग, विज वितरण कंपनी, ध्वनी प्रदुपन, पर्यावरण नियंत्रण विभाग, अन्न व औषधी प्रशासन, प्रादेशीक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग प्रमुख, सर्व तालुक्यातील न.पा. मुख्यधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व तहसिलदार, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, उपस्थित होते. तसेच सदर बैठकीस धुळे शहरातील सिरत कमिटीचे सदस्य, जिल्यातील मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक, नगरसेवक, माजी नगरसेवक हजर होते.
