शिवसेना पक्षाच्या शिरपूर तालुक्यात दोन शाखांचे अनावरण

शिवसेना पक्षाच्या शिरपूर तालुक्यात दोन शाखांचे अनावरण


शिरपूर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात शिवसेना ( उ.बा.ठा) या पक्षाच्या बांधणीसाठी व तळागाळातील लोकांपर्यंत व ग्रामीण भागातील सामान्य माणसापर्यंत पक्षाच्या विस्तार वाढवून पक्षाची ध्येय धोरणे तू आगामी काळातील वाटचाल याबाबत जनतेत संदेश जाण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या मोहिमे अंतर्गत प्रत्येक विभाग जनसंपर्क वाढवून शाखा विस्तार करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.


या आदेशाचे पालन करत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शिवसेना पक्षाच्या तालुक्यातील बभळाज, नागेश्वर बंगला येथे शेकडो युवकांच्या साक्षीने शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या शाखांचे अनावरण विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र धनावडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमांतर्गत नागेश्वर बंगला, बभळाज येथील शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुख यांच्या नियुक्ती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.बभळाज शाखाप्रमुख म्हणून आकाश भिल व उपशाखाप्रमुख म्हणून मुकेश महानोर, नागेश्वर बंगला शाखाप्रमुख दिलीप शिंदे  तर उपशाखाप्रमुख प्रशांत गुजर यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.

याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत ,उप जिल्हा संघटक विभा भाई जोगराना, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंह राजपूत, तालुकाप्रमुख अत्तर सिंह पावरा, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, माणिक गुजर, नाना गुजर, एन डी पवार, नन्हा जाधव,सोमा पाटील ,देवा बंजारा, प्रदीप राजपूत,सचिन चौधरी,अमोल पाटील, भीमसिंग कर्नल, यांच्यासह परिसरातील असंख्य शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन  भटू शिंदे राहुल गुजर यांनी केले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने