पंढरपूरच्या आरोग्य शिबिराचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!!

पंढरपूरच्या आरोग्य शिबिराचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!!


अकरा लाख 64 हजार रुग्णांची झाली तपासणी!!

आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना प्राध्यापक शिवाजीराव सावंत
यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित!!


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले  अभिनंदन!!!

करमाळा (प्रतिनिधी)

जगातील सर्वात मोठा मेडिकल कॅम्प म्हणजेच आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची जागतिक रेकॉर्ड बुकात नोंद झाली आहे

नॅशनल बुक रेकॉर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज वेभ यांनी ही माहिती दिली आहे

या रेकॉर्ड नंतर दिलेल्या प्रमाणपत्रात म्हटले आहे की पंढरपूर येथे पाच हजार सातशे डॉक्टरांच्या मदतीने अकरा लाख 64 हजार 684 रुग्णांची एकाच आरोग्य शिबिरात संपूर्णपणे तपासणी करण्यात आली आहे
या सर्व रुग्णावर प्राथमिक उपचार करून प्राथमिक तपासण्या करून तात्काळ उपचार करण्यात आले
जवळपास दोन लाख चष्म्याचे वाटप करण्यात आले
यात निष्पन्न झालेल्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मोफत सोय करण्यात आली

हे आरोग्य शिबिर पार पाडण्यासाठी शिवसेनेची तब्बल दहा हजार कार्यकर्ते आठ दिवस परिश्रम घेत होते


प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सोलापूर--

दिवाळीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भक्ताचे आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले होते
जवळपास 11 लाख 64 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली याची दखल जागतिक वर्ल्ड बुकने घेतली असून तसे प्रमाणपत्र आम्हाला दिले आहे
या पुरस्कारामुळे आमच्या कामाची आम्हाला पावती मिळाली असून इथून पुढील काळात जास्तीत जास्त आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले


एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी आरोग्यमंत्र्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात माता सुरक्षित घर सुरक्षित सारखे अभियान राबवून राज्यातील चार कोटी महिलांच्या आरोग्य तपासणी केली आहे
सर्व शासकीय रुग्णालयातील सर्व तपासण्या मोफत केले आहेत
सार्वजनिक आरोग्य विभागातील नोकर भरती पूर्ण करून दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत
व आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे झालेले आरोग्य शिबिर जगातील सर्वात मोठे आरोग्य शिबीर ठरले असून याचे सर्व योग्य दान सावंत बंधूंना असून त्यांचे मी अभिनंदन करतो.

अमोल बापू शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर

सोलापूर शहरात आत्तापर्यंत सात आरोग्य शिबिर झाले असून अत्यंत तळागाळातील मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत उपचार दिले जात आहेत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात आरोग्याची चळवळ उभा करणार आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने