शिंगावे येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन

शिंगावे येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन



शिरपूर : तालुक्यातील शिंगावे येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुधारणात्मक नळ पाणी पुरवठा योजने उदघाटन करण्यात आले.


या कामाची अंदाजपत्रकीय किंमत रुपये 67 लाख 48 हजार 452 रुपये आहे. कुणाल नगर 30 हजार लिटर, फुले नगर 95 हजार लिटर व आदिवासी वस्ती शिंगावे 30 हजार लिटर



माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती व युवा नेते चिंतनभाई पटेल यांच्या शिफारशीने व मार्गदर्शनाखाली कामे मिळाली. धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, स्विय सहाय्यक अशोक कलाल, शिंगावे गणाचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत दामोदर पाटील, शिंगावे गावचे प्रभारी सरपंच चंद्रकांत लोटन पाटील (भुरा पाटील) या सर्वांच्या पाठपुरावाने काम मंजूर झाले.


या योजनेचे भूमिपूजन धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत दामोदर पाटील, शिंगावे गावचे प्रभारी सरपंच चंद्रकांत लोटन पाटील (भुरा पाटील), ग्रा. पं. सदस्य रवींद्र पाटील, सदस्य गोविंदा थोरात, सदस्य मंजुळाबाई पवार, सदस्य कविताबाई बागुल, सदस्य मनोहर भिल, सदस्य धीरज पाटील, माजी सरपंच प्रताप आधार पाटील, प्रियदर्शिनी सूतगिरणी संचालक मधुकर सोमजी पाटील, विष्णू निंबा पाटील, विकास सोसायटी सदस्य आर. एस. पाटील, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन हिम्मतराव पाटील, विकास सोसायटी व्हा. चेअरमन शशिकांत लक्ष्मण पाटील, शिरीष मनोहर पाटील, सागर नाटु पाटील, युवराज साहेबराव भदाणे, मुरलीधर हिलाल पाटील, माजी सूतगिरणी संचालक अशोक एकनाथ पाटील, प्रा. अरुण पवार, माजी सरपंच आनंद सखाराम भिल, माजी संचालक जयवंत पाटील, जिजाबराव अर्जुन पाटील, दिलीप निंबा पाटील, नवल पंडित पाटील, संजय विश्वास पाटील, विजय प्रताप पाटील, नवनीत गोपाळ पिंगळे, ताराचंद हिरामण पाटील, शांतीलाल ढेपु पाटील, छोटू यु मोरे, मनोज डुडवे, रविंद्र पिळोदेकर, आर. आर. पाटील, राजेंद्रसिंग राजपूत, भूरेसिंग मालचे, अर्जुन महाजन, गणेश देशमुख, धनराज पाटील, शेखर चव्हाण, धनंजय पाटील, गोपाल ठाकूर, मनोज पाटील, पुष्पेद्र पाटील, कॉलनी परिसरातील व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने