देशात जालियनवाला घडले तसे महाराष्ट्रात जालनावाला घडले, उद्धव ठाकरेंच्या राज्य सरकार सह केंद्रावर हल्लाबोल

देशात जालियनवाला घडले तसे महाराष्ट्रात जालनावाला घडले, उद्धव ठाकरेंच्या राज्य सरकार सह केंद्रावर हल्लाबोल


जळगाव प्रतिनिधी - काल महाराष्ट्रातील जळगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकार राज्य सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका करून हल्लाबोल केला आहे. यात प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाटीमाराचा उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला असून ज्याप्रमाणे देशात जालियनवाला कांड घडले तसे महाराष्ट्रात जालना वाला कांड घडले अशा शब्दात उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार व गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. 

काल जळगावात एका पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्ताने ठाकरे जळगाव येथे आले होते यावेळेस त्यांनी जाहीर सभेद्वारे लोकांना संबोधन केले. सध्या उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरे करत असून जनतेशी संवादाबरोबर शेतकऱ्यांचे देखील संवाद साधत आहेत. यादरम्यान ते शिंदे सरकारवर जोरदार टीका करत आहे. काही लोकांच्या डोक्यात हवा गेली आहे आणि ते फुग्यासारखे हवेत गेले आहेत त्या फुगांना टाचणी लावण्याचे काम आता तुम्हा सर्वांना करायचे आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ता आली काय आणि गेले काय मी सत्तेसाठी धडपडत नाही देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न मला पळत नाही ,जागे करण्याचे काम मला वंशपरंपरेने आले असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.

 शिवाय ते असे देखील म्हणाले आहेत की सातत्याने टीका करण्यात येते की शिवसेनेची काँग्रेस होईल 25 वर्षे भाजप सोबत राहून शिवसेनेचे भाजप झाले नाही तर मग काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेची काँग्रेस कशी होणार. आम्ही शिवसेनेला कमलाबाईची पालखी वाहणारी होऊ देणार नाही,जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा हिंदू खरेमे है अशा घोषणा देत होते आता यांची नऊ वर्षे झाले सरकार येऊन तरी काश्मीरमधील काश्मीर पंडितांना न्याय देत आहे आला नाही. राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकार असताना देखील हिंदूंना आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे हेच आपले दुर्दैव आहे .

अशा घनाघाती शब्दात त्यांनी टीका केली असून मुख्यमंत्र्यांना दिल्ली जाण्यास वेळ आहे मात्र मराठा बांधवांसाठी आमरण उपोषण करून आपला जीव पणाला लावणारा मनोज जरांगे यांच्या उपोषण ठिकाणी  जाण्यास त्यांना वेळ नाही.

हे कसले पोलादी पुरुष हे तर तकलादी पुरुष

केंद्रातील भाजप सरकार आता डगमगायला लागले असून माझ्या महापौर आणि उपमहापौरांसह इतर सहकाऱ्यांना कायद्याच्या धाक दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे त्यांच्या घरी धाडी टाकल्या जात आहे. मात्र देशाची संपत्ती लुटून राज रोस फिरणारे आरोपी यांना दिसत नाहीत. यापूर्वीचे पौलादी पुरुष हे केवळ नावाने नव्हे तर कामाने देखील पौलादी होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा स्वातंत्र्य करून घेतला. देशाला अखंड ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले मात्र यांना मणिपूर देखील शांत करता आले नाही आणि स्वतःला पौलादी पुरुष म्हणून संबोधन करून घेत आहे तुम्ही कसले पौलदी पुरुष तुम्ही तर तकलादू  पुरुष आहात अशी देखील टीका त्यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने