धुळे ग्रा. भाजपा जिल्हा कोषाध्यक्षपदी आबा धाकड

धुळे ग्रा. भाजपा जिल्हा कोषाध्यक्षपदी आबा धाकड



शिरपूर : (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामिण जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी जिल्हा कार्यकारणी जाहिर केली असुन त्यात जिल्हा कोषाध्यक्षपदी शशिकांत (आबा) धाकड शिरपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आबा धाकड हे अनेक दिवसांपासुन भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असुन त्यांनी भवानी मंदीर परिसरात युवा मोर्चा शाखा अध्यक्षपदापासुन पक्षात कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते सामाजिक, राजकिय व धार्मिक कार्यात सतत कार्यरत असतात. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड यांचे माजीमंत्री आ.अमरीशभाई पटेल, धुळे ग्रा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने