शिरपुर शहर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न

शिरपुर शहर पोलीस ठाण्यातर्फे  पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न


शिरपूर - आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरपुर शहर पोलीस ठाण्यातर्फे शहरातील शकुंतला लॉन्समध्ये अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी उशिरा बैठकीचे आयोजन करण्यात आले.


        याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण,इरफान मीर्जा, राजू टेलर,संजय असपुरे विजयसिंग राजपुत,रजाक कुरेशी,यांनी आपले विचार मांडून अत्यंत उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीने शांतता बैठक संपन्न झाली.यावेळी विशेषतः गणेशोत्सव काळात सर्व सामान्य नागरिकांचे हाल व त्यांच्या गैरसोय बाबत कुठलीही तडजोड होणार नसल्याचे पोलीस प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले असून उत्सव सामाजिक सलोखा आणि एकोप्याने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधवांचा मुहंमद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद व अनंत चतुर्थदशी अर्थात गणेश विसर्जन एकाच दिवशी होत असल्याने मुस्लिम बांधवांनी आपला उत्सव एक दिवस नंतर साजरा करण्याचे जाहीर करीत यावर्षी सग दुसऱ्यांदा आपला उत्सव एक दिवस उशिरा साजरा करीत जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे हिंदू बांधवांनी देखील आपल्या धर्माचा उत्सव आनंदात आणि जल्लोषात साजरा करीत असतांना दुसऱ्या धर्माचा जातीचा आदर राखून आपला सण उत्सव साजरा करावा आणि या वर्षांपासून गुलालाची उधळण न करता फुलांचा वर्षाव करीत आपल्या शहराचा आदर्श निर्माण करावा असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी तर सूत्रसंचालन महिला पीएसआय छाया पाटील यांनी केले.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,तहसीलदार महेंद्र माळी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर,नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.तुषार नेरकर, विद्युत वितरणचे अधिकारी बढे,शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय कर्मचारी,शहर व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी,बँड-डीजे आदी वाद्यधारक, शांतता कमिटीचे सदस्य.पोलीस पाटील,सरपंच, माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने