माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर व धुळे कॅम्पस येथे 13 व 14 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन



 माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर व धुळे कॅम्पस येथे 13 व 14 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

शिरपूर : माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल शिरपूर व एस. व्ही. के. एम. संस्था संचलित सावळदे ता. शिरपूर व धुळे कॅम्पस येथे 13 व 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

धुळे येथील एस. व्ही. के. एम. कॅम्पस व शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस या दोन ठिकाणी 13 सप्टेंबर रोजी तसेच सावळदे ता. शिरपूर येथील एस. व्ही. के. एम. कॅम्पस व आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज, आर. सी. पटेल आय. एम. आर. डी., आर. सी. पटेल सिनिअर कॉलेज मध्ये एच. आर. पटेल फार्मसी कॉलेज, आर. सी. पटेल बी. एड. कॉलेज, आर. सी. पटेल डी. एड. कॉलेज याप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. या सर्व ठिकाणी तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या सह इतर सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट संचालिका कु. द्वेता दीदी भुपेशभाई पटेल यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्तकेंद्राला भेट दिली असता कळले की, सदरहू रक्तकेंद्रात 'नॅट' (न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग) उपलब्ध आहे, जे सर्वात जास्त सुरक्षित रक्त आहे. म्हणजेच आपण जेव्हा केव्हाही रक्तदान करतो त्या वेळेस आपल्या रक्ताची रेग्युलर टेस्टिंग तर होतेच परंतु, नॅट टेस्टिंग व रेग्युलर टेस्टिंग यात काही फरक आहे. उदाहरणार्थ, रेग्युलर टेस्ट मध्ये जर रक्तदात्याला एच. आय. व्ही. लागण 10 दिवसापूर्वीच झालेली असेल आणि रक्तदात्याला ते माहिती नसेल आणि त्यांनी रक्तदान केले तर रेग्युलर टेस्ट मध्ये ते कळत नाही. त्यामुळे रक्त घेणाऱ्याचा सुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो. रेग्युलर टेस्टिंग द्वारे एच. आय. व्ही. लागण झाल्याच्या 25 दिवसानंतर कळते की, हे रक्त कुणालाही देण्यास योग्य नाही, परंतु 'नॅट' टेस्टिंग केल्यास एच. आय. व्ही. सारखी लागण झाल्याच्या 5 दिवसातच कळत की हे रक्त कुणालाही देणे योग्य नाही. त्याच प्रमाणे रक्तदात्याला हिपॅटायटीस-बी आजार असल्यास रेग्युलर टेस्ट द्वारे 56 दिवसा नंतर कळतो. परंतु, नॅट टेस्टिंग द्वारे 20 दिवसातच तो कळू शकतो. तसेच हिपॅटायटीस-सी आजार रेग्युलर टेस्ट द्वारे 70 दिवसात कळतो तर नॅट टेस्ट द्वारे 5 ते 7 दिवसातच कळतो. नॅट टेस्टिंग रक्त हे रेग्युलर टेस्टिंग रक्ता पेक्षा फक्त 700 रुपये प्रति बॅग महाग आहे. परंतु पुढील उर्वरित सर्व आयुष्याचा प्रश्न पाहता नॅट टेस्टिंग रक्त अतिशय सुरक्षित आहे.


म्हणूनच माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कु. द्वेतादीदी भूपेशभाई पटेल यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने जळगाव येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी द्वारे 13 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी आर. सी. पटेल इंजिनिअरिंग कॉलेज, शिरपूर येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत तसेच 14 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत सावळदे येथे एस. व्ही. के. एम., एन. एम. आय. एम. एस. कॅम्पस मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे.

येथील रक्तदात्याचे फायदे : 
• रक्तदात्याचा गौरव पत्र देऊन सन्मान, रक्तदात्याला रक्तदाता प्राधान्य कार्ड.
• पुरूष रक्तदाता प्राधान्य कार्डवर रु. 300 प्रमाणे सेवाशुल्कात सवलत.
• महिला रक्तदाता प्राधान्य कार्डवर रु. 400 प्रमाणे सेवाशुल्कात सवलत.
• स्वत: रक्तदात्याला रक्ताची गरज पडल्यास विनामूल्य रक्त पिशवी उपलब्ध करण्यात येईल.
• प्रत्येक रक्तदाना नंतर रक्तदाता याला एका वर्षासाठी अपघात पॉलिसी रु. ५० हजार.

नॅट हे तंत्रज्ञान संपूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानव निर्मित त्रुटी पुर्णपणे टाळल्या जातात. या तपासण्यासाठी लागणारे सेवाशुल्क प्रयोगशाळा साहित्य, रसायने इत्यादि साठी खर्च लक्षात घेता योग्य सेवाशुल्क घेऊन रक्त व रक्तघटक रक्तकेंद्रामध्ये उपलब्ध झालेले आहेत. मात्र रक्त संक्रमणामुळे होऊ शकणार्‍या एच.आय.व्ही. व कावीळच्या औषधोपचारांचा अतोनात खर्च न भरून निघणारे शारीरिक, मानसिक नुकसान टाळण्यासाठी सर्वोत्तम, सर्वाधिक सुरक्षित उपलब्ध रक्ताचा आग्रह करा, आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचे जीवन अधिक सुरक्षित बनवूया असेही आवाहन करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने