Breaking News
शिरपूरात आदिवासी विकास मंत्री डॉ. गावितांना काळे झेंडे दाखवून स्वागत व निषेध
आदिवासी टोकरे कोळी समाजाने आदिवासी विकास मंत्री डॉ. गावितांना शहरातील करवंद नाक्यावर दाखवले काळे झेंडे
मणिपूरच्या दुर्दैवी आणि तालुक्यातील आदिवासी क्रांतिकारकांचा फलक फाडल्याच्या घटनेचा करण्यात आला निषेध
शिरपूर -
आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या विविध मागण्या आणि देशातील मणिपूर घटनेचा व तालुक्यात सांगवी येथे आदिवासी दिनानिमित्ताने लावलेले फलक काही समाज कंटकांडून फाडण्यात आल्याचा निषेधार्थ व त्यानंतर उसळलेल्या दंगलीचा निपक्षपणे तपास करून निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावे यासाठी शिरपुर येथे आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांचे आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून स्वागत केले.आदिवासी विकासमंत्री तथा आमदार डॉ. विजय कुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपुर येथे रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास करवंद नाक्यावरील अग्रेसन भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.मात्र स्वतः डॉ.विजयकुमार गावित हे सायंकाळी सहा सव्वा सहा वाजेच्या सुमारास शिरपुर शहरात दाखल झाले.यावेळी शिरपुर शहरासह तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहादा रस्त्यावरील आशीर्वाद हॉस्पिटल जवळ काळे झेंडे दाखवून विवीध घोषणा देत जोरदार स्वागत केले.दरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
.png)