*शांताराम दुनबळे एक सद्गुनी पत्रकार*...!!!
संपूर्ण *येवला* तालुक्यात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे, *शांतारामजी दुनबळे* यांचा 21 ऑगस्ट हा *वाढदिवस* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे धर्मांतराची घोषणा केल्यामुळे समस्त आंबेडकरी जनतेची *मुक्तीभूमी* म्हणून येवल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे *पैठणीचे* शहर म्हणून येवल्याचा *नावलौकिक* साता समुद्रा पार झालेला आहे. कधीकाळी उपेक्षित/ दुर्लक्षित /दुष्काळी भाग असलेला येवला ना. भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मोठ्या कल्पकतेने विकास साधत महाराष्ट्रात सतत राजकीय वर्तुळात चर्चेत आहे, *येवला* तालुक्यातील *पिंपळगाव लेप* या गावातील भूमिपुत्र, *मुक्ती भूमीची* धूळ कपाळी लावून यंत्रनगरी तसेच बाबासाहेबांच्या कर्मभूमी नाशिकच्या दिशेने सामाजिक *जाणिवा* जागृत ठेवून सामाजिक कौटुंबिक विकास साधण्यासाठी सातपूर शहरात वास्तव्य करून कंपनीमध्ये कामधंदा करत आंबेडकरी चळवळीच्या कंगोऱ्यांचा अनुभव घेत सामाजिक बांधिलकी म्हणून चळवळीत महत्त्वाचे योगदान देऊन पत्रकारितेच्या माध्यमातून आंबेडकरी विचार मनामनात रुजवण्याचे काम अविरत व्रतस्ता प्रमाणे करीत आहेत. वाहतं पाणी जसं दगड आडवा आला तरी त्याच्या खालून वाट काढून पुढे जात राहतं, तसा प्रवास दुंनबळे साहेबांचा सुरू आहे. सशाची हार झालेली कथा दुनबळे सरांनी वाचलेली आहे. म्हणूनच कुठेही न थांबता, विसावा न घेता, *आंबेडकरी विचारांची शिदोरी* घेऊन विचार पेरण्याचे काम निस्वार्थ भावनेने करीत आहेत सतत, निरंतर....
अशा ह्या सद्गुनी पत्रकारास/ कार्यकर्त्यास/ नेत्यास जन्मदिनाच्या मनस्वी *धम्मांकित* शुभेच्छा...!!
