वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्षपदी उमिॅला गायकवाड तर शहरध्यक्ष रेखाताई देवरे
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर महिला आघाडीच्या जम्बो कार्यकारणीची घोषणा रविवारी शासकीय विश्रामगृहावर करण्यात आली. आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हाध्यक्षपदी उर्मिला गायकवाड तर शहराध्यक्षपदी रेखा देवरे यांची नियुक्ती झाली आहे.तसेच जिल्हा व शहर महिलाआघाडीची कार्यकारणीही यावेळी जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून प्रत्येकाने संघटन वाढीसाठी प्रयत्न करून आगामी सर्व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला उत्तम यश प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे नूतन पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र नेते पंडित नेटावटे,चित्राताई कुरे,
जिल्हाध्यक्ष उर्मिला ताई गायकवाड,
जिल्हा महासचिव बाळासाहेब शिंदे,
तालुका निराक्षक बाळासाहेब जाधव,
महानगर प्रमुख अविनाश शिंदे,
महानगर महासचिव संजय साबळे,
सचिव हरिफ अन्सार कोमल पगारे विशाल पडमुखं,
विवेक तांबे आदी यावेळी उपस्थित होते
जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
कल्पना हरित महाले,जया कवले,मीना गांगुर्डे,फर्जना शेख( सर्व उपाध्यक्ष),ॲड. ज्योती गांगुर्डे व प्रतिभा पानपाटील(महासचिव),माया मोरे,हिरा महाले,शोभा मोरे,शशिकला शिंदे,ज्योती निकम,अलका गुंजाळ( सर्व संघटक), दीपाली थोरात(सचिव),सविता पवार, (संपर्कप्रमुख),छाया गांगुर्डे,प्रतिभा जाधव (सहसचिव) तसेच वंदना भंडारी, सुरेखा पगार दिपाली गायकवाड उषा रणदिवे,शिलाबाई गांगुर्डे,सुवर्णा कदम,भाग्यश्री महाजन,भारती जोशी,अश्विनी कदम,तुळसाबाई गांगुर्डे, रूपाबाई मगर,भिमाबाई सुरजे,रेखा साबळे,मिनी भरीत, मीना तपासे,अलका पठाडे,उषाताई रोकडे,निर्मला अडकिते,रेखा जगताप,अश्विनी कोटमे,अनिता नाईक, विमल कांबळे,कविता लांडे,मीना पगारे, सुनिता घेगडमल(सर्व सदस्य).
तसेच नाशिक शहर महिला आघाडी कार्यकारणी पुढील प्रमाणे- मोहिनी गांगुर्डे(महासचिव),अनिता कांबळे( शहर संघटक),उषा पगारे( उपाध्यक्ष),पद्मिनी इंगळे( संपर्क प्रमुख),कुणाल गायकवाड -निरभवण( उपाध्यक्ष),अंतरा वाघ (सहसचिव),दिव्या साळवे,रुखसाना शेख व शारदा देहाडे( सर्व सातपूर उपाध्यक्ष),मनीषा मोरे (सातपूर संघटक),हिना शेख( नाशिक पूर्व अध्यक्ष),संगीता हिरे(उपाध्यक्ष),मनिषा खंदारे,पूजा जाधव व रमाबाई गांगुर्डे( सर्व संघटक),नीतू सोनकांबळे( नाशिक रोड अध्यक्ष), सुरेखा बर्वे( नाशिक रोड उपाध्यक्ष),मनीषा वळवे( सदस्य),मोनिका भालेराव( उपाध्यक्ष),नूतन साळवे( संघटक),मनीषा रूपवते( उपाध्यक्ष), रुपाली दरगुडे( उपाध्यक्ष), मोनिका महाले (संघटक), सोनाली उजागरे( शहर संघटक), मीना उबाळे( प्रबुद्ध नगर प्रमुख), शकुंतला खरात( चिंचोळा प्रमुख),शीला भगत( चिंचोळा संघटक),रशिदा पठाण (संघटक),कृष्णाबाई सगर( उपाध्यक्ष),गंगाबाई कांबळे(संघटक),लीना खरे (उपाध्यक्ष),आरती सूर्यवंशी, कविता नवाळे,लता अहिरे मीना आव्हाड, सुमन गायकवाड,स्वाती राऊत,अलिषा पठाण व अश्विनी थोरात(सर्व सदस्य).
[28/08, 4:30 pm] Shantaram Dinbule Nashik: *कांदा* अनुदान जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा,येवला तालुका मराठा ```महासंघाची``` _मागणी_ .
न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात देखील जाणार जिल्हा कार्याध्यक्ष शेळके पाटील यांची माहिती.
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:केंद्र सरकारने कांद्याच्या करवाढीवर घेतलेल्या निर्णयावर राज्यभर आंदोलन चालू आहे त्यातच आता कांदा अनुदान जमा होत नाही म्हणून येथील शेतकऱ्यांनी थेट राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा या आशयाचे निवेदन येथील पोलीस निरीक्षक विशाल क्षीरसागर यांना मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके पाटील व शेतकऱ्यांनी दिले आहे यावेळी प्राध्यापक प्रवीण निकम राजेंद्र सोनवणे उत्तम शिंदे सिताराम गायकवाड वाल्मीक शेळके यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते. मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत लक्षवेधी मध्ये विचारले गेलेल्या प्रश्न उत्तरांमध्ये कांद्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले होते की कांद्याचे अनुदान हे 15 ऑगस्ट च्या आत जमा करण्यात येईल परंतु अद्याप देखील हे अनुदान जमा झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे याबाबत कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने 15 ऑगस्ट या तारखेची वाट बघत होता तसेच 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन असल्यामुळे मंत्री आपली फसवणूक करू शकत नाही स्वतंत्र दिनाचा आधार घेऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी नाराज झालेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली फसवणूक याबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोटवावे लागतील अशी देखील या निवेदनात म्हटले आहे तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास हेच शिष्टमंडळ सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे आत्ताच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील कर 40% वाढवून शेतकऱ्याची कोंडी केली आहे. सध्याची परिस्थिती बघता नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे सध्या परिस्थितीत असलेले मका,सोयाबीन,टोमॅटो हे पिके पाण्याअभावी शेतकऱ्याला सोडून द्यावी लागत आहे. आधीच फार मोठ्या संकटाला शेतकरी सामोरे जात असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळवले आहे त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे ही बाब प्रशासनाने लक्षात घ्यावी.
शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र सरकारने 2,410 रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रतिकिलो कांदा खरेदीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांना 24 रुपये देणार होते परंतु अद्याप तशी कुठलीही परिस्थिती दिसत नाही. हीच बाब टोमॅटोच्या बाबतीत देखील झालेली आहे.
.राज्यात सध्याच्या कांद्याचे परिस्थितीवर शेतकरी ज्या पद्धतीने न्याय मागत आहे. परंतु त्यांना न्याय मिळत नाही त्यांना तात्काळ न्याय मिळेल या भूमिकेत प्रशासनाने सहकार्य करून तात्काळ गुन्हा दाखल करावा असे या निवेदनात म्हटले आहे. यावर येथील पोलीस निरीक्षक विशाल शिरसागर यांनी वरिष्ठांशी बोलून तात्काळ निर्णय घेतो असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात येवला येथे गुन्हा दाखल होतो की नाही याकडे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
