राष्ट्रीय क्रीडा व प्रबुद्ध लोककला विद्यापीठ स्थापन करा - अध्यापकभारती-कर्डक प्रतिष्ठाणची सरकारकडे मागणी- शरद शेजवळ* नाशिक शांताराम दुनबळे

*राष्ट्रीय क्रीडा व प्रबुद्ध लोककला विद्यापीठ स्थापन करा - अध्यापकभारती-कर्डक प्रतिष्ठाणची सरकारकडे  मागणी- शरद शेजवळ* 
       
नाशिक  शांताराम दुनबळे


        नाशिक-:कला व क्रीडा- खेळ मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.मानवाच्या जीवनात उत्तम आरोग्य, प्रभावी व्यक्तिमत्व हिच खरी संपत्ती, समृध्द जीवनाची गुरुकिल्ली होय.खेळाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास,राष्ट्रीय अस्मिता वृद्धिंगत तर होतातच सोबतच सांघिक भावना उन्नत होतात. देशाच्या परिवर्तनशील लोकप्रबोधक कला- देशी-विदेशी खेळ तथा क्रीडा क्षेत्रातील उन्नतीसाठी राष्ट्रीय व राज्य कला-क्रीडा विद्यापीठ आणि जिल्हा- तालुकास्तरावर कला-क्रीडा विद्यालय स्थापन करण्यात यावी अशी भूमिका अध्यापकभारती व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र सन २००० पासून विविध आंदोलन,सत्याग्रह,ठिय्या, सह्यांच्या मोहिमांद्वारे सरकारकडे सातत्याने मागणी करत असून केंद्र व राज्य सरकार गंभीर नसून केवळ घोषणा खेरीज ठोस कृती होत नसल्याने अध्यापकभारती व कर्डक प्रतिष्ठान आंदोलनात्मक भूमिका घेईन असे माहिती उभय संस्थांच्या वतीने संस्थापक शरद शेजवळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली असून केंद्र व  महाराष्ट्र राज्य सरकारला निवेदन देऊन केली आहे.

       भारता सारख्या खंडप्राय देशात कला-क्रीडा-शिक्षण विकासा संदर्भात कोणताही ठोस धोरणात्मक कार्यक्रम नाही.कला- क्रीडा-शिक्षण-प्रशिक्षणाबद्दल केवळ शासकीय घोषणाबाजी होते. प्रत्यक्षात मैदनात कोणतेही कृती नियोजन नसते व नाही म्हणून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ क्रमवारीत आणि नियोजन शुन्यतेमुळे यशस्वी कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या स्पर्धेतही नगण्याच असते. शाळा, महाविद्यालय पातळीवर खेळाचे शिक्षण- प्रशिक्षण,विविध कला-क्रीडा स्पर्धा यांस योग्य मार्गदर्शन व भरघोस आर्थिक तरतुद करुन नवोदय विद्यालय व राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय कला- क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणे आवश्यक आहे.




राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना अभियानच्या मुख्य मागण्या : प्रमुख मागण्या 
राष्ट्रीय व राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना केंद्र राज्याने करावी, नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर तालुका, जिल्हा स्तरावर निवासी कला-क्रीडा विद्यालय, महाविद्यालय स्थापन करावीत.
  १) अनुदानित-विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी संख्ये प्रमाणे कला- क्रीडा व कार्यानुभव,संगणक शिक्षक न
नियुक्त करावेत. २) महाराष्ट्र शासनाने २००२ मध्ये घोषीत केलेले क्रीडा धेारण त्वरीत अंमलात आणावे. ३) जिल्हा स्तरावरील कला-क्रीडा प्रबोधिनीची- प्रवेश क्षमता यात वाढ करावी. ४) शाळा- महाविद्यालय विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धा- प्रशिक्षण या करीता जास्तीत जास्त अर्थिक तरतुद करण्यात यावी. ५) महाराष्ट्र शासनाने यापुर्वी घोषीत केलेल्या मिनिऑल्मपिक स्पर्धा दर २ वर्षा आड त्वरीत सुरु कराव्यात. ६) तालुका स्तरावरील क्रीडा संकुले-खेळाची मैदाने यांच्या कामाला गती द्यावी व ते लवकरात लवकर पूर्ण करुन लोकार्पित करावेत. ७) शाळा- महाविद्यालय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या गरिब, ग्रामीण, कष्टकरी विद्यार्थी मुला-मुलींना केंद्र व राज्य सरकारने दत्तक घेवुन त्यांच्या कला-क्रीडा,कार्यानुभव, संगणक शिक्षण प्रशिक्षणाची जबाबदारी घ्यावी. ८) खेळाडुंच्या शासकीय नोकरी नियुक्तीत पारदर्शकता आणावी व त्यांना सन्मानाने वागवावे.९) कला-क्रीडा,संगणक व कार्यानुभव हे विषय शाळा महाविद्यालयात अनिवार्य विषय म्हणून शिकविले जावेत. १०) स्वतंत्र कला-क्रीडा,कार्यानुभव,कार्यानुव  विद्यालयांची स्थापना करण्यात यावी.अशा प्रमुख मागण्या संदर्भात केंद्र व राज्य सरकार कडे 
कलावंत,साहित्यिक क्रीडापटू, कला-क्रीडा मंडळे, संस्था,संघटना यांनी सदर राष्ट्रीय कला व क्रीडा विद्यापीठ स्थापना कार्यात सहभाग घेत आहेत.कला-क्रीडा व कार्यानुभव विषयाच्या व्यापकता करता स्वतंत्र विद्यापीठ/विद्यालय स्थापना होणे आवश्यक असून हा विषय शाळा महाविद्यालयातुन अनिवार्य करण्यात यावेत ह्या भूमिकेबद्दल अध्यापकभारती, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान,नाशिक यांच्या भूमिकेस जनतेने पाठिंबा देऊन जनरेटा वाढवावा,कृतीशील सहभाग नोंदवावा असे आवाहन शरद शेजवळ यांनी केले आहे.
        प्रबुद्ध लोककला विद्यापीठ भारतीय संविधानास अभिप्रेत समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ह्या जीवन मुल्यांवर आधारीत सांस्कृतिक समाज रचना स्थापित करणे व समस्त मानवाचे लोकरंजनातून लोकप्रबोधन कला-साहित्य संस्कृतिचा ठेवा चिरंतन तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता कलाविष्कार जतन करत त्या कलांचे शिक्षण प्रशिक्षण देण्यात यावे.


नव्या पिढीला आपल्या कला-क्रीडा जीवनाची महती कळावी,आपल्या साहित्य कला क्रीडा जीवनावर अभ्यास चिंतन शोध व्हावेत,कला-क्रीडा प्रकारांचे शिक्षण प्रशिक्षण पदवी-पदव्युत्तर शिक्षण स्वतंत्र कला/क्रीडा विद्यापीठातून दिले जावे अशी अपेक्षा आहे. भारत देशाच्या कला-क्रीडा तथा सांस्कृतिक इतिहासाची ओळख अभ्यास होणे व त्याचा संवर्धन-प्रचार प्रसार शिक्षण-प्रशिक्षण या करता विद्यापीठ/विद्यालया खेरीज दुसरा मार्ग असू शकत नाही.प्रचलित विद्यापीठातून एखादा छोटा विभाग कला क्रीडा शिक्षण अभ्यासाकरिता सुरू करून भारतीय कला व क्रीडा प्रकारांचा अवमान न करता कला-क्रीडा विद्यापीठ लवकरच अस्तित्वात येवोत अशी आग्रही भूमिका शरद शेजवळ यांनी पत्रकात मांडली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने