*तरुण-तरुणींनी मोबाईल दूर ठेऊन अधिकाधिक वेळ ग्रंथालयात द्यावा व आपले करिअर घडवावे* कॅप्टन कुणाल गायकवाड
मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक सामाजिक,साहित्य, आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक व धम्मविचार तरुणांनी आचरणात आणावा व आपल्या शैक्षणिक जीवन काळातच आपली योग्यता सिद्ध करावी असे आवाहन कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी केले. लोककवी वामनदादा कर्डक यांनी बुद्ध कबीर तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योति महात्मा फुले शाहू महाराज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या शाहिरीतून लोक माणसात रुजवले तोच वारसा आजच्या कवी गीतकार शाहीर कलावंतांनी पुढे न्यावा व आजच्या देशाच्या सर्वार्थाने विपरीत झालेल्या ज्वलंत सामाजिक,राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक, क्षेत्राबद्दलच्या समस्येवर आपल्या शाहिरी कवणातून जळजळीत भाष्य करावं तरुणांनी लेखण्या हाती घेऊन लोकशाही,समता स्वातंत्र्य,न्याय,बंधुता,राष्ट्रीय एकता व एकात्मता या संविधानिक मूल्यावर आपला देश बळकट करावा असे उद्गार कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी काढले डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वाचक मेळावा व वामनदादा कर्डक यांच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समीक्षक साहित्यिक प्रा डॉ.जीभाऊ मोरे हे होते प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिके चे संस्थापक प्रा शरद शेजवळ यांनी केले मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व कर्डक अभ्यासिकेच्या स्थापने मागील हेतू हा ग्रामीण,कष्टकरी,शेतकरी, शेतमजूर,श्रमकरी वर्गातील मुलांना विविध स्पर्धा परीक्षा साठी आवश्यक असलेले उपयुक्त पुस्तके व अभ्यासकेसाठी मोफत प्रवेश सुविधा गेल्या चार वर्षापासून पुरवली जात असून जास्तीत जास्त युवक युवतींनी या संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे व वाचनालयाच्या साधन सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी दानदात्यांनी ग्रंथ पुस्तके व फर्निचर स्वरूपातील वस्तू वाचनालयास भेट कराव्यात असे आवाहन यावेळी शेजवळ यांनी केले.
वाचनालयाचे संस्थापक शरद शेजवळ,सचिव शैलेंद्र वाघ,स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघ,उपाध्यक्ष गौतम पगारे,रमेश गायकवाड,सुभाष गांगुर्डे,रणजित संसारे,सुरेश खळे सामाजिक कार्यकर्ते विकास वाहुळ,विकास घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते.अभ्यासिकेचे विद्यार्थी
मिलिंद पान पाटील ( नीट परीक्षा उत्तीर्ण,सदाशिव वाहूळ रेल्वे कर्मचारी निवड,सविताताई धीवर कामगार तलाठी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
ह्या प्रसंगी रामभाऊ वाहुळ,प्रदीप पगारे,ऋषी गायकवाड,रोहित गायकवाड,शुभम गायकवाड
,महेश जाधव,ऋतिक गायकवाड,अक्षय गरुड,
सुमित गरुड,ललित भांबरे,पवन दळे,समाधान निकाळे,
सचिन गरुड,तमन्ना सिद्दीकी,
समिक्षा मेथे,जयश्री सदाफळ,साक्षी वाणी,सायली पवार,सुवर्णा पाबळे आदी विद्यार्थी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ यांनी केले तर आभार शैलेंद्र वाघ यांनी मानले.
