मालपुर ते सुराय रस्त्याची दुरावस्था, ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आंदोलन

 

मालपुर ते सुराय रस्त्याची दुरावस्था, ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आंदोलन


दोंडाईचा प्रतिनिधी - शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत ठेकेदार हे निकृष्ट काम करून शासनाच्या निधी हडप करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.


यात प्रहार संघटने कडून निवेदन देण्यात आले असून त्यात नमूद केले आहे की मालपूर सुराय रस्ता हा मे जून महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले व ते काम आजूबाजूला मुरूम टाकून व जुन्या रस्त्यावर पन्नास एमएम खडी वापरून त्याच्यावर डांबरीकरण करण्यात आलं व सदर रस्ता 1900 मीटरचा असून रुंदीला  साडेपाच मीटर असून पंधरा दिवसांपूर्वी तेथे मोठा खड्डा पडला त्या खड्ड्यामधून खडी ही पूर्ण ओपन झाली त्यामुळे रस्त्यावर एक अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली.  तालुक्यातील या रस्त्याचे काम अतिशय निकृष्टपणे करण्यात आले असून सदर कामात ठेकेदार यांनी कर्तव्यात कसूर केला असून भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. याबाबत कोणतेही ठोस कारवाई न झाल्यास प्रहार ने आंदोलनाच्या इशारा दिला आहे.


या वेळी ॲड एल आर गिरासे,  तालुका प्रहार संघ पक्षाचे अध्यक्ष पंकज सिसोदिया, तालुका उपाध्यक्ष सोनू राजपूत ,दोंडाईचा ग्रामीणचे किशोर राजपूत व राहुल गिरासे हितेश पाटील अजय पाटील उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने