लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त पिंगाने येथे कृषी कन्यांतर्फे शालेय साहित्य वाटप
पिंगाने तारीख 1 ऑगस्ट 2023 रोजी कृषी कन्यांतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरा करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून हितेश सोनवणे , खुशी पाटील, पूजा पवार, रश्मी गडाख, तेजस्विनी राजपूत व वैष्णवी धात्रक या कृषी कन्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळे यांचे वाटप केले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य शेख गयास शेख सिकंदर खाटीक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या फोटोला पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमात दोन विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना शिक्षिका वैशाली वाघमारे, माधुरी आहेर व रीना बोढरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.
