फुटबॉल सामना बरोबरीत रंगला. .! मुंबई - बांद्रा (प्रतिनिधी. महेश्वर तेटांबे)

 



फुटबॉल सामना बरोबरीत रंगला. .! 


मुंबई - बांद्रा (प्रतिनिधी. महेश्वर तेटांबे)

एफ ए मुंबई फुटबॉल असोसिएशन यांच्या सौजन्याने बांद्रा नेवील डिसूजा ग्राउंड मुंबई येथे वेटरान फुटबॉल लीग आयोजित फुटबॉल टूर्नामेंट नुकतीच संपन्न झाली. त्यात ठाणे फुटबॉल संघ आणि बॉम्बे टाइगर जेजे संघ यांच्यामधील अटीतटीच्या फुटबॉल सामन्यात १--१ असा सामना बरोबरी वर संपला. या सामन्यात ठाणे फुटबॉल संघामधून श्याम खरात यांनी एक गोल नोंदवला त्यानंतर २५ व्या मिनिटात छगन चव्हाण यांनी पास दवून गेस्टन दिकोस्त यांनी गोल नोंदवून बॉम्बे टायगर जेजे यांना खेळ १--१ असा आणला. या संपुर्ण स्पर्धेत छगन चव्हाण व सरफराज अन्सारी व टीम यांनी आपल्या संघासाठी खूप मेहनत घेतली पण सामना बरोबरीत समाप्त झाला या सामन्यासाठी बॉम्बे टायगर जे जे संघाचे प्रशिक्षक श्री तुषार चव्हाण यांनी संघावर विशेष मेहनत घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने