भामपूर येथे आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्साहात प्रारंभ
शिरपूर : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून शिक्षकांनी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते हे अधिकाधिक दृढ व्हावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी केले.
शिक्षण विभाग पंचायत समिती शिरपूर, तालुका मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर ता. शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने स्तरीय विज्ञान ४३ वे शिरपूर तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाला १२ जानेवारी २०२३ रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित भामपूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे
उद्घाटन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड होते. यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, पंचायत समिती सदस्य वनिताताई पाटील, जुने भामपूर सरपंच सुशिलाबाई भिल, नवे भामपूर सरपंच बाळासाहेब मोहन पाटील, जुने भामपूर उपसरपंच बाळासाहेब चंद्रकांत देवरे, उपसरपंच डॉ. दोरीक, पोलीस पाटील संभाजी पाटील, प्राचार्य पी. व्ही. पाटील, शिरपूर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष एस. एन. बोरसे, आर. सी. पटेल माध्य. विद्यालय भामपूरचे मुख्याध्यापक व्ही. पी. दीक्षित, आर. एन. पवार (सचिव तालुका मुख्याध्यापक संघ), निलेश देसले (अध्यक्ष शिरपूर विज्ञान व गणित अध्यापक संघ), श्रीमती डॉ. निता सोनवणे (शिक्षण विस्तार अधिकारी), आर. के. गायकवाड (शिक्षण विस्तार अधिकारी), ई. बी. आव्हाड (शिक्षण विस्तार अधिकारी), श्रीमती मनिषा वानखेडे (शिक्षण विस्तार अधिकारी), डी. पी. बुवा (शिक्षण विस्तार अधिकारी), बी. एस. बुवा (शिक्षण विस्तार अधिकारी) विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड यांनी आपल्या मनोगतात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा देऊन सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.
अनेरडैम येथील आश्रम शाळेचे विज्ञान शिक्षक प्रेमराज अहिरे यांच्या सहकार्यातून रिमोटच्या साह्याने विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
शिरपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 120 विद्यार्थी व 27 शिक्षक असे एकूण 147 जणांनी सहभाग घेतला आहे. 147 विज्ञान साहित्य व उपकरणे मांडण्यात आले आहेत. पूर्व प्राथमिक गटात 16 साहित्य, उच्च प्राथमिक गटात 49 विज्ञान साहित्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात 42, उच्च प्राथमिक आदिवासी गटात 8, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी गटात 5, प्राथमिक शिक्षक गटात 14, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटात 8, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक शिक्षक 1, लोकसंख्या शिक्षण माध्यमिक शिक्षक 1, प्रयोगशाळा परिचर प्राथमिक सहाय्यक 1, प्रयोगशाळा परिसर माध्यमिक सहाय्यक 1 असे एकूण 147 विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक समिती प्रमुख प्रा. राकेश चौधरी हे असून पूर्व प्राथमिक इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या गटासाठी आर. वाय. पाटील, श्रीमती व्हि. डी. बिऱ्हाडे, श्रीमती तृप्ती बडगुजर, उच्च प्राथमिक सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गटासाठी सौ. प्रतिभा गिरासे, जी. के. सोनवणे, सचिन जडिये, माध्यमिक व उच्च माध्यमिक नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गटासाठी प्रा. डी. एस. साळुंखे, बी. एस. राजपूत, एस. डी. गाडीलोहार, पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांसाठी व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्या गटासाठी प्रा. सौ. एम. एन. पाटील, प्रा. चेतन अहिरे, नंदकिशोर बाविस्कर हे शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
प्रास्ताविक भामपूर येथील शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. दिक्षित, सूत्रसंचालन ए. ए. चौधरी व दिनेश ठाकरे यांनी केले. आभार विज्ञान शिक्षिका श्रीमती एस. बी. पाटील यांनी मानले.
विज्ञान गणित मंडळ जिल्हा उपाध्यक्ष के. डी. बच्छाव, तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष एस. एन. बोरसे, विज्ञान गणित अध्यापक संघ तालुकाध्यक्ष एन. एम. देसले, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, भामपूर येथील शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभत आहे.
पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार १३/१/२०२३ रोजी दुपारी २ वाजता अनेक अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
